राज्यातील हजारो शिक्षकांना कसा मिळणार दिलासा ?...वाचा सविस्तर

मंगेश गोमासे
Tuesday, 18 August 2020

राज्यात एक जुलैपासून नववी ते बारावीच्या ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आली. शिक्षणमंत्र्यांनी आदेश काढून आता केजी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले. मात्र, सध्या बरेच शिक्षक महानगरपालिका आणि जिल्ह्यात कोरोना सर्व्हेक्षणासाठी फिरत आहेत. काही शिक्षक क्वारंटाइन सेंटरवर कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे केव्हा हा प्रश्‍न शिक्षकांना पडला होता.

नागपूर ः राज्यात ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील बरेच शिक्षक सध्या कोरोनाच्या सर्व्हेक्षणामध्ये व्यस्त असल्याने ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी वाऱ्यावर आहेत. महापालिका आणि शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे हा प्रश्‍न उपस्थित होत होता. त्यामुळे आता यापुढे शिक्षकांना या कामापासून सूट देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेत तसा आदेश काढला आहे.

राज्यात एक जुलैपासून नववी ते बारावीच्या ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आली. शिक्षणमंत्र्यांनी आदेश काढून आता केजी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले. मात्र, सध्या बरेच शिक्षक महानगरपालिका आणि जिल्ह्यात कोरोना सर्व्हेक्षणासाठी फिरत आहेत. काही शिक्षक क्वारंटाइन सेंटरवर कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे केव्हा हा प्रश्‍न शिक्षकांना पडला होता.

पॉलिटेक्निकच्या नोंदणीला का मिळतोय अल्प प्रतिसाद ....वाचा सविस्तर

विशेष म्हणजे शिक्षक आणि संघटनांकडून वारंवार पालिका आणि शिक्षण विभागाला शिक्षकांना या कामातून काढून घेत त्यांच्या मूळ आस्थापनांवर पाठविण्यासाठी निवेदने देण्यात आले होते. मात्र, दोन्ही विभागाकडून या विषयाला बगल देण्यात येत असल्याचे चित्र होते. यामुळे आत्तापर्यंत शिक्षक नाक्यावर आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये कामावर होते. आता सरकारने आदेश काढल्यावर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिक्षकांना शिकविण्याच्या कामाशिवाय इतरच कामे देण्यात येतात. सध्या बरेच शिक्षक कोरोना सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांनी शाळेत जाऊन ऑनलाइन केव्हा शिकवावे हा प्रश्‍न होता. आता सरकारने आदेश काढले आहे. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविता येणे शक्य होईल.

योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How will thousands of teachers in the state get relief?