HSRP Number Plate : ‘एचएसआरपी’च्या शुल्कामध्ये बदल होणार नाही; प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदीनुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे.
HSRP Number Plate
HSRP Number Platesakal
Updated on

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदीनुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. ही नंबरप्लेट लावण्यासाठीचे महाराष्ट्रातील शुल्क इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. या शुल्कामध्ये विसंगती असल्याचे आरोप होत आहेत. तरी सर्व पुरावे तपासून घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल. तथापि शुल्कामध्ये बदल होणार नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार ॲड.अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेटच्या दरासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास सरनाईक यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, आतापर्यंत १६ लाख ५८ हजार ४९५ वाहनांनी ‘एचएसआरपी’साठी नोंदणी केली आहे. त्यापैकी तीन लाख ७३ हजार ९९९ वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावल्या आहेत. निविदा प्रक्रियेत कार्यक्षमतेसाठी तीन विभाग तयार केले आहे. वेगवेगळ्या क्लस्टरच्या माध्यमातून कामाचे नियोजन केले आहे.

‘एचएसआरपी’ लावण्याची मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना त्यांच्या वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com