मोठी बातमी ! अडचणीतील शंभर वर्षाच्या सोलापूर जिल्हा बॅंकेने 'अशी' घेतली पुन्हा उभारी

तात्या लांडगे
Wednesday, 1 July 2020

बॅंकेबाबत ठळक बाबी... 

 • अनुत्पादित कर्जाच्या थकबाकीमुळे मे 2018 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने केली होती प्रशासक नियुक्‍ती 
 • प्रशासकांनी दोन वर्षांत वसूल केली बिगरशेतीची अनुत्पादित 182 कोटींची थकबाकी वसुली 
 • शंभर वर्षाच्या बॅंकेच्या इतिहासात होत्या तीन हजार 400 कोटींच्या सर्वाधिक ठेवी 
 • दोन वर्षांपूर्वी असलेल्या एक हजार 858 कोटींच्या ठेवी आता तीन हजार कोटींवर 
 • सद्यस्थितीत बॅंकेची शेतीची 627 कोटी तर बिगरशेतीची 389 कोटींची आहे थकबाकी 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शंभरावा वर्धापन दिन साजरा केला. मात्र, बॅंकेची अनुत्पादित कर्जाची थकबाकी वाढल्याने काही दिवसांतच (मे 2018) रिझर्व्ह बॅंकेने प्रशासक नियुक्‍तीचा निर्णय घेतला. परंतु, आता प्रशासक नियुक्‍तीनंतर अडचणीतील जिल्हा बॅंक पुन्हा उभारी घेत आहे. बॅंकेच्या ठेवीत दोन वर्षांत तब्बल अकराशे कोटींची वाढ झाली असून बिगरशेतीची अनुत्पादित 182 कोटींची थकबाकीही वसूल केली आहे. 

राज्यातील कोल्हापूर, पुणे, सातारा, नांदेड, गोंदिया, भंडारा, लातूर, सोलापूर, नगर, बुलढाणा या जिल्हा बॅंकांनी खरीप कर्जवाटपात बाजी मारली आहे. मात्र, सोलापूर जिल्हा बॅंकेतून मागील सात वर्षांपासून नव्या सभासद शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या धोरणांमुळे अर्बन बॅंकांचे आणि शासनाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या एकूण सहाशे कोटींच्या ठेवी कमी झाल्या. आता सहकार आयुक्‍त अनिल कवडे यांच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेने ठोस नियोजन करीत ठेवी वाढविणे अन्‌ शेती-बिगरशेतीच्या थकबाकी वसुलीत बाजी मारली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता बॅंकेने पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा काही जिल्हा बॅंकांमधील कर्जवाटपाचा अभ्यास सुरु केला आहे. 

बॅंकेबाबत ठळक बाबी... 

 • अनुत्पादित कर्जाच्या थकबाकीमुळे मे 2018 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने केली होती प्रशासक नियुक्‍ती 
 • प्रशासकांनी दोन वर्षांत वसूल केली बिगरशेतीची अनुत्पादित 182 कोटींची थकबाकी वसुली 
 • शंभर वर्षाच्या बॅंकेच्या इतिहासात होत्या तीन हजार 400 कोटींच्या सर्वाधिक ठेवी 
 • दोन वर्षांपूर्वी असलेल्या एक हजार 858 कोटींच्या ठेवी आता तीन हजार कोटींवर 
 • सद्यस्थितीत बॅंकेची शेतीची 627 कोटी तर बिगरशेतीची 389 कोटींची आहे थकबाकी 
 •  
 • नव्या सभासदांनाही मिळेल कर्ज 
  मे 2018 मध्ये बॅंकेची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस नियोजन केले आहे. प्रतिकर्मचारी व्यवसाय वाढीचे उद्दिष्टे दिले. अधिकारी, कर्मचारी उत्तम काम करीत आहेत. बॅंकेच्या ठेवी साडेतीन हजार करण्याचे उद्दिष्टे असून नव्या सभासद शेतकऱ्यांचे सात वर्षांपासून बंद असलेले कर्जवाटप सुरु केले जाणार आहे. 
  - शैलेश कोथमिरे, प्रशासक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The hundred-year-old Solapur District Bank took up the challenge