
मुंबई : शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही गट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहेत. दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं भिन्न नावं आणि चिन्हं दिले आहेत. त्यात शिंदे गटानं निवडणूक आयोगापुढं तीन नावांचे पर्याय दिले होते. त्यांपैकी 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मान्य झालं. यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर कोटी केली आहे. (I have to pay royalties if my photo is used Balasaheb Thorat made a funny statement)
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे नक्की कोणाची असे प्रश्न मिश्किलमध्ये विचारले जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या गटाकडूनही या नावावरुन नक्की कोणाची शिवसेना? असा सवाल करण्यात आला आहे. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक बाळासाहेब आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर असतील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील यावरुनच पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर थोरातांनी ही कोटी केली आहे.
"आता खरं म्हणजे बाळासाहेब थोरातांची शिवसेना म्हटलं तर मला त्यांच्याकडून फोटो लावला तर रॉयल्टी घ्यावी लागेल" अशी कोटी थोरात यांनी केली. त्यांच्या या कोटीनंतर एकच हशा पिकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.