Sushma Andhare: मी शिवबंधन सोडते आणि किरीट सोमय्यांचा दोरा बांधते.. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare: मी शिवबंधन सोडते आणि किरीट सोमय्यांचा दोरा बांधते.. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील घडामोडी आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या की, शिवबंधन सोडून मी किरीट भाऊच्या नावाचा गंडा बांधते. पण त्यांनी राणेचा बंगला अधिकृत आहे का? याचं उत्तर द्यावं आणि बंगला अधिकृत नसेल तर राणेंचा बंगला का तोडला नाही तेही सांगावं? भाजपमध्ये गेल्यानंतर आरोप असलेल्या नेत्यांवरील कारवाई थांबते. भाजपकडे असं कोणतं वॉशिंगमशीन आहे, हे एकदा भाजपने स्पष्ट करावं, असा सवलही अंधारे यांनी यावेळी केला आहे. सुषमा अंधारे या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

हेही वाचा: Shraddha Murder Case: भरचौकात फाशी द्या; संजय राऊतांची मागणी

त्या बोलताना म्हणाल्या की, भाजपा कपटी कारस्थानी करणार आहे. भाजपने द्वेषमूलक राजकारण सुरू केलंय. हे राजकारण संपून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर शिंदे गट हा माझा भाऊच आहे. परंतु शिंदे गटात गेलेल्यांना आता पश्चाताप होत आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.