राखी पाठविणाऱ्या 25 लाख बहिणींचा मी आभारी : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नारी शक्ती सन्मान सोहळ्यावेळी ते बोलत होते.

मुंबई : ''राखी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला राख्या पाठविल्या. त्यासोबत विचार आणि सल्ले पत्राद्वारे कळविले. या सर्व 25 लाख बहिणींचा मी ऋणी आहे,'' अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नारी शक्ती सन्मान सोहळ्यावेळी ते बोलत होते. 'एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात राख्या पाठविण्याचा हा जागतिक विक्रम असून तो मी माझ्या सर्व बहिणींच्या नावे करतो. तुम्ही भाऊ म्हणून माझ्यावर जो विश्वास दाखवलात त्यामुळे मी भारावून गेलो आहे,' असेही ते पुढे म्हणाले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आजच्या काळातील स्त्री, बहिण, मुलगी या सर्वजणी सक्षम असून त्या समाजात सकारात्मक ऊर्जा पसरविण्याचे काम करत आहेत. आपल्या बहिणी आपल्या पाठीशी आहेत आणि राज्याच्या विकासात त्या सोबतही आहेत. समाजाच्या जडणघडणीत असणारे त्यांचे काम कौतुकास्पद असून नारीशक्तीला आणखी बळ मिळावे, यासाठी सर्वांनी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I thankful of the 25 lakh sisters who sent Rakhi says CM