esakal | श्री साईबाबा संस्थानवर थेट आयएएस अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

high court

यासंदर्भातील अवमान याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती न्या. एस. व्ही. गंगापूरवाला, न्या. आर. एन. लड्डा यांनी निकाली काढली

श्री साईबाबा संस्थानवर थेट आयएएस अधिकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी थेट आयएएस असलेल्या भाग्यश्री बनायत यांची शासनाने नेमणूक केली. त्यामुळे यासंदर्भातील अवमान याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती न्या. एस. व्ही. गंगापूरवाला, न्या. आर. एन. लड्डा यांनी निकाली काढली. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी थेट आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी दाखल अवमान याचिका सुनावणीस निघाली असता, मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी निवेदन केले.

संस्थानचे तत्कालीन सीईओ कान्हुराज बगाटे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर भाग्यश्री बनायत (थेट आयएएस) यांची उच्च न्यायालयाच्या १९ मार्च २०२१ च्या आदेशानुसार नियुक्ती केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नियुक्तिपत्रही खंडपीठात दाखल केले. त्यामुळे याचिका निकाली काढण्यात आली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. प्रज्ञा तळेकर, ॲड. अजिंक्य काळे आणि ॲड. यू.आर.आवटे यांनी काम पाहिले.

loading image
go to top