IAS Pooja Khedkar: खेडकर यांचा नवा कारनामा समोर! UPSC चे प्रयत्न संपल्यानंतरही दोनवेळा दिली परीक्षा? धक्कादायक माहिती उघड

IAS Pooja Khedkar New Shocking Information: खेडकर पूजा दिलीपराव या नावाने त्यांनी २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी आपल्या नावात बदल केला आणि परीक्षा दिली आहे.
Pooja Khedkar
Pooja Khedkar
Updated on

मुंबई- प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. UPSC चे सर्व प्रयत्न संपल्यानंतर पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर पूजा दिलीपराव या नावाने त्यांनी २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी आपल्या नावात बदल केला आणि परीक्षा दिली आहे. त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोनवेळा परीक्षा दिली आहे. 'साम टीव्ही'च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या आईने पंकजा मुंडेंच्या संस्थेला १२ लाख का दिले? पंकजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

सर्वसामान्यपणे पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून ९ वेळा परीक्षा देता येत होती. पण, त्यांनी नावात बदल करून तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे. नव्या खुलाशामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. याशिवाय यूपीएससी परीक्षेबाबत अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही धक्क्याची बाब आहे.

Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरची 'लाल दिव्याची' गाडी अखेर पोलिसांच्या ताब्यात; पाहा व्हिडिओ

पूजा खेडकर यांच्या असाधारण मागण्यांमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांचे पाय खोलात जात असल्याचं चित्र आहे. कारण, पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली आहे. शिवाय PMOने पूजा खेडकर यांचा अहवाल देखील मागवल्याची माहिती आहे. याप्रकरणी तपास सुरु असून काही अनियमितता आढळून आल्यास पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

खेडकर यांनी नगरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचे सर्टिफिकेट घेतले आहे. बहुनेत्र दोष आणि मानसिक आजार याबाबत त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले होते. याचा फायदा घेऊन त्यांनी बहुविकलांगता कोट्यातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे त्यांचे हे सर्टिफिकेट देखील वादाच्या भोवऱ्यात आहे. याप्रकरणी तपास केला जात असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com