
जयंत पाटील अन् अजित पवारांनी एकत्र दौरा काढला तर, सुप्रिया सुळेंचं सूचक विधान
मुंबई : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र दौरा काढला तर, राज्यात मोठा बदल होऊ शकतो, असे मोठं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. असे झाल्यास २०२४ मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होईल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. आज राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्यांच्या या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पैसे देऊन जाणारे आहेत, त्यांच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावी असे देशातील लोकांना वाटत असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी पवारसाहेबांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिल्याचे त्या म्हणाल्या.
आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. त्यामुळे पुढे काय असे जेव्हा मी पवार साहेबांना विचारते तेव्हा ते पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत असे सुपिया सुळे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले आहे.
Web Title: If Ajit Pawar Jayant Patil Work Together Then Ncp Can Be Number One Party In 2024 Maharashtra Elections Says Supria Sule
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..