Asaduddin Owaisi : ''जरांगे पाटलांनी बोलावल्यास विचार करु...'', संभाजी नगरमध्ये ओवैसींचं सूचक विधान

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएमने बैठक बोलावली होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ओवैसी म्हणाले की, मी मनोज जरांगे यांची इज्जत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. कारण जरांगे पाटील यांच्यामुळे आठ खासदार निवडून आले.. पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समजाचे उमेदवार जिंकतात पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाहीत.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Updated on

छत्रपती संभाजी नगरः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला वेळ शनिवारी संपला. त्यामुळे उद्या रविवारी ते काय निर्णय घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. त्यापूर्वी शनिवारीच संभाजी नगरमध्ये जरांगे पाटलांची शांतता रॅली संपन्न झाली.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हेदेखील छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटलांबद्दल मतं व्यक्त केली आहेत. मुस्लिमांनी जरांगेंकडून शिकलं पाहिजे, असं म्हणत जरांगेंनी बोलावलं तर नक्की विचार करु, असं सूचक विधान ओवैसींनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएमने बैठक बोलावली होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ओवैसी म्हणाले की, मी मनोज जरांगे यांची इज्जत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. कारण जरांगे पाटील यांच्यामुळे आठ खासदार निवडून आले.. पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समजाचे उमेदवार जिंकतात पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाहीत.

ओवैसी पुढे म्हणाले की, इम्तियाज जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रमधील मुस्लिम समाजात राग आहे.आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचं दुःख आहे. मुस्लिमांनी सर्वांना मतदान केलं, मग आम्हाला का मतदान करत नाही, यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे.

Asaduddin Owaisi
PM Narendra Modi : ''महाराष्ट्राला जगाचं आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य'', मुंबईत पंतप्रधानांनी सांगितलं राज्याचं भविष्य

''मनोज जरांगे यांचा प्रस्ताव आला तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करेन.. बीडमधून जरांगेंमुळेच पंकजा मुंडे पडल्या.'' असं म्हणत ओवैसी पुढे म्हणाले, मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश आहेत, मोदी म्हणतात मी बँकवर्डचा नेता आहे, मग बिल आणा आरक्षणाच्या टक्क्यांचं.. महाराष्ट्रात एक मुस्लिम उमेदवार दिला नाही, आमचा एक उमेदवार होता त्याला देखील सर्वांनी मिळून हरवलं आहे. आम्ही सर्वांना मत दिले पण आमचा उमेदवार पाडला.

ओवैसींच्या या प्रस्तावावर मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. जरांगेंनी सरकारला दिलेला वेळ शनिवारी संपला असल्याने रविवारी ते पुढील आंदोलनाबाबत योग्य ती भूमिका स्पष्ट करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com