
वानखेडेंविरोधात पुरावे असतील तर मलिकांनी कोर्टात जावं - NCB
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आजही असेच आरोप करत समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर आता एनसीबीकने देखील नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत नवाब समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आर्यन खान हा स्वत: तिकिट विकत घेऊन त्या पार्टीमध्ये गेला नव्हता, तर त्याला प्रतिक गाबा आणि अमीर फर्निचरवाला हे त्या पार्टीत घेऊन गेले होते. त्यानंतर आता एनसीबीने नवाब मलिक यांच्याकडे जर पुरावे असेल तर त्यांनी ते कोर्टात सादर करावे असं आवाहन केलं आहे. तसेच एनसीबीकडून असंही सांगण्यात आलंय की, वानखेडे आणि सॅम डिसोझा यांच्यात संपर्क नव्हता असं इंडिया टुडेच्या वृत्तामधून समोर आलं आहे.
हेही वाचा: मालिकांचे 'NCB'वर आरोप; रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया
दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सॅम डिसूझाचे नाव समोर आले आहे. के.पी. गोसावीचा अंगरक्षक असल्याचा दावा करणार्या प्रभाकर साईलने आरोप केला आहे की, आर्यन खानला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी गोसावी आणि सॅम डिसोझा यांना २५ कोटी रुपयांच्या खंडणीबद्दल बोलताना ऐकले आहे.
हेही वाचा: NCBमध्ये चांडाळचौकडी! नवाब मलिकांनी उघड केली नावं
Web Title: If Nawab Malik Has Evidence Why Doesnt He Go To Court Question Of Ncb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..