"गुन्हेगार नाहीत तर समोर या"; अनिल परबांचा सोमय्यांना टोला

वेगवेगळ्या प्रकरणात सदावर्ते गुन्हेगार आहेत त्यामुळं त्याचा तपास पोलीस करत आहेत.
anil parab
anil parabesakal

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी कोर्टानं आज भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. दरम्यान, सोमय्या सध्या गायब आहेत. यापार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सोमय्या जर गुन्हेगार नसतील तर त्यांनी समोर यावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. अनिल परब आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये एसटी सेवा सुरळीत करण्याबाबत बैठक पार पडली. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (If You are not criminal come forward Anil Parba slams on Kirit Somaiya)

परब म्हणाले, "सोमय्यांनी पैसे तर गोळा केले आहेत पण हे पैसे राजभवनात पोहोचलेले नाहीत असं पत्र खुद्द राजभवन कार्यालयानं दिलं आहे. त्यामुळं याची चौकशी तर होणारचं. सोमय्या दुसऱ्यांना सांगतात जर गुन्हा केला नसेल तर तपास यंत्रणांच्या चौकशीला का घाबरता? मग आता जर ते गुन्हेगार नसतील तर त्यांनी समोर यावं. सोमय्यांविरोधातील गुन्ह्याचं एकंदर स्वरुप बघुन पोलीस याबाबत निर्णय घेतील"

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सत्र न्यायालयानं आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावर बोलताना परब म्हणाले, जर एसटी संबंधीच्या गुन्ह्यात कोणी आरोपी असेल तर एसटी कायद्यातून कारवाई करण्याची तरतूद आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे भडकावलं गेलं. ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या घरावर हल्ला घडवून आणला गेला, त्यामुळं या हल्ल्याचे सूत्रधार तेच आहेत अशा प्रकारची बाजू आज कोर्टात मांडली. तेच याचे सूत्रधार आहेत हे शोधण्यासाठी त्यांना कस्टडीत घेणं गरजेचं असल्याचाही यावेळी युक्तीवाद झाला.

एसटी कर्मचाऱ्यांकडून अनेक तक्रारी दाखल

बऱ्याच ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. विविध प्रलोभन दाखवून त्यांना फसवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा करण्यात आल्याचं या तक्रारींमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं या सर्व तक्रारींचा तपास करणं गरजेचं आहे. चार ते पाच ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये आम्हाला फसवून विलिनिकरण मिळवून देतो. शंभर टक्के मी हे करुनच दाखवणार अशा पद्धतीची आमिष आम्हाला दाखवली गेल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. एसटीच्या कामगारांमध्ये एक लाख कामगार आहेत यांपैकी अनेकांनी पैसे दिलेत त्याची किंमत कोट्यवधी रुपये होते. या पैशाचा वापर कालच्या हल्ल्यात झाला आहे का? याचा तपास करणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकरणात ते गुन्हेगार आहेत त्यामुळं त्याचा तपास पोलीस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com