Maharashtra Weather Update
Maharashtra Weather UpdateEsakal

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीसह गारपीटीचा तडाखा; 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
Published on

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. इतकंच नाही तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरावरून राज्यातील हवामान बदललं असून वाऱ्यांच्या आद्रतेचे प्रमाण वाढल्याने कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यातही ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.

Maharashtra Weather Update
Voting From Home: दिव्यांग, वृद्धांना घरुनच करता येणार मतदान, लोकसभा निवडणुकीत प्रथमच अंमलबजावणी; भरावा लागेल फॉर्म

मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश यासह अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गारपिटीचा इशारा

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली असतानाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यवतमाळ येथे कमाल तापमान ३९.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. येत्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Weather Update
औज बंधाऱ्यात १३ दिवस पुरेल इतकेच पाणी! उजनीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याची मागणी; १० मार्चनंतर धरणातून सुटणार पाणी

कमी दाबाचा पट्टा निवळला

उत्तर केरळपासून ते कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत असून, सायंकाळनंतर पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. २) उत्तर महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा दिला आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

येथे येलो अलर्ट

जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, - धुळे, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.

Maharashtra Weather Update
सोलापूर जिल्ह्यात पुन्हा वाढतेय हातभट्टीची नशा! १० महिन्यांत १ लाख लिटर हातभट्टी, २० लाख लिटर गूळमिश्रित रसायन नष्ट; ‘ही’ ५४ ठिकाणे हिटलिस्टवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com