esakal | Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Death

कोरोनाचा संसर्ग न झालेले जिल्हे
मुंबई उपनगर, रायगड, सोलापूर, धुळे, नंदूरबार, परभणी, बीड, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, अकोला

मुंबई-पुण्यात वाढ का?
१)  मोठ्या लोकसंख्येची शहरे
२)  लोकसंख्येची घनता जास्त
३)  परदेशात जाणारे जास्त प्रवासी
४)  झोपडपट्टीवासीयांची मोठी संख्या

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव

sakal_logo
By
योगिराज प्रभुणे

पुणे - निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८ दिवसांत कोरोन विषाणूच्या संसर्गाने विखळ्यात घेतले. मुंबई, पुणे आणि ठाणे या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे ८६ टक्के रुग्ण आहेत. उर्वरित महाराष्ट्रात १४ टक्के रुग्णांची नोंद आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीच्या विश्‍लेषणवरून हे निष्कर्ष निघाले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील पहिल्या रुग्णांची नोंद पुण्यात ९ मार्चला झाली. त्यानंतर रोज राज्याच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाचा रुग्ण मिळत गेला. सुरवातीला परदेशातून आलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांना कोरोना झाल्याचे निदान होऊ लागले. पण, आता सापडत असलेल्या बहुतांश रुग्णांना नेमक्‍या कोणत्या रुग्णापासून (इंडेक्‍स पेशंट) संसर्ग झाला, निश्‍चित याची माहिती मिळविणे कठिण होत गेले आहे. तसे निरीक्षणही सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी नोंदवत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या २८ दिवसांमध्ये राज्यातील ३६ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्णांची नोंद झाली आहे. उर्वरित १४ जिल्हे अद्यापपर्यंत कोरोनामुक्त असल्याची माहिती मिळाली.

जगाच्या तुलनेत महाराष्ट्र
लोकसंख्येची घनता सर्वाधिक असूनही महाराष्ट्रात युरोपियन राष्ट्रांच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण किमान ६ एप्रिलपर्यंत सर्वाधिक कमी आहेत. सरकारी पातळीवर तत्काळ केलेल्या उपाययोजना आणि जनजागृती ही कारणे असू शकतात. त्याचवेळी, महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण अद्यापी कमी असल्याकडेही तज्ज्ञ लक्ष वेधतात. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रादेशिक विभागांपैकी मुंबई आणि पुण्याचा समावेश असलेल्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक आहे. मुंबई उपनगर आणि रायगड वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. मध्य महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये अद्यापपर्यंत एकाही रुग्णांची नोंद नाही. 

८६ टक्के रुग्ण मुंबई, पुणे आणि ठाण्यात
राज्यात सोमवारी सकाळपर्यंत आढळलेल्या ७८१ रुग्णांपैकी ६० टक्के (४६९) रुग्ण मुंबईतील आहेत. त्या खालोखाल पुण्यात १५ टक्के (११९) रुग्णांची नोंद झाली आहे. ठाण्यात ११ टक्के (८२) रुग्ण आढळले. या तीनही शहरांमध्ये मिळून ८६ टक्के रुग्णांची नोंद आहे. उर्वरित १९ जिल्ह्यांमधून १४ टक्के रुग्णांना कोरोनाच्या निदान झाले असल्याचा निष्कर्षही निघतो.

loading image
go to top