भूमिपुत्रांसाठी मोठी बातमी; शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचे ठराव केले पारित

Eknath Shinde
Eknath Shinde esakal

शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आलाय. शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीमध्ये पुढील काळातील पक्षाची वाट चाल कशी असावी या संदर्भात ठराव पार पडले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाची मुख्य नेते पदी निवडकरण्यात आली असून पक्षाचे सर्वाधिकार शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहेत.

Eknath Shinde
Eknath Shinde : मोठी बातमी! शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी नव्हे तर या पदावर झाली एकनाथ शिंदेंची निवड

तर या कार्यकारिणीत मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव, ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा ठराव आणि स्वातंत्र्यवीर यांना भारतरत्न देण्यात यावा याचा ही ठराव करण्यात आला आहे.

सोबतच कार्यकारिणीत पक्षाविरोधात कारवाई करणाऱ्यांसाठी एक तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

शिवसेनेची आगामी संघटनात्मक वाटचाल करण्यासाठी शिस्तबद्ध समितीची स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीचे अध्यक्षपद मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलंय. तर या समितीमध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि संजय मोरे यांची सदस्य म्हणून निवड केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com