माझ्या 'डेथ सर्टिफीकेट'वरही औरंगाबादचेच नाव हवं; इम्तियाज जलील आक्रमक

औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची मागणी मंजूर करण्यात आली.
Imtiaz Jaleel news, Aurangabad News, Sambhaji Nagar News
Imtiaz Jaleel news, Aurangabad News, Sambhaji Nagar News esakal

औरंगाबाद - तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये ठाकरे सरकारने नामांतराचे दोन प्रस्ताव मंजूर केले. त्यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश होता. औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची मागणी मंजूर करण्यात आली होती. मात्र आता नामांतरावरून औरंगाबादचं राजकारण तापण्याचे चिन्हं असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) नामांतरावरून आक्रमक झाले आहेत. (Imtiaz Jaleel aggressive on Name change of Aurangabad)

Imtiaz Jaleel news, Aurangabad News, Sambhaji Nagar News
औरंगाबादचं नामांतर अवैध, पुन्हा निर्णय होणार - देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद येथे इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. नामांतराचा मुद्दा हा हिंदू-मुस्लीम मुद्दा आहे. आम्ही सर्वजण छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करतो. मात्र सत्तेत बसलेल्या पक्षाच्या एका नेत्यांने २५ ते ३० वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये येऊन नामांतराची इच्छा व्यक्त केली होती. केवळ त्या नेत्याच्या इच्छेखातर आपण नामांतराचा अन्याय सहन का करायचा, असा सवाल जलील यांनी बैठकीत उपस्थित केला. (Imtiaz Jaleel news in Marathi)

औरंगाबादच्या नामांतराच्या वेळी आपण शांत राहिलो तर येण्याऱ्या पुढ्या आपल्याला नक्कीच विचारेल की, जेव्हा या शहराचं नामांतर होत होतं, तेव्हा तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामांतराला विरोध व्हायलाच हवा. माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून मला मृत्यू देखील औरंगाबादमध्येच यायला हवा. माझ्या बर्थ सर्टिफीकेटवर औरंगाबाद आहे. तर डेथ सर्टिफीकेटवरही औरंगाबादच असायला हवं, असही जलील यांनी म्हटलं.

दरम्यान नामांतराविरोधात आपण न्यायालयात जाणार आहोत. गरज भासल्यास रस्त्यावरही उतरू असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com