व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होतील भविष्यात "एमपीएससी'च्या मुलाखती !

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होतील भविष्यात एमपीएससीच्या मुलाखती
MPSC
MPSCMedia Gallery
Summary

कोणत्याही राज्यातील आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा प्रयोग केला नसून, केंद्रीय लोकसेवा आयोगानेही तसा प्रयोग केला नाही. त्यामुळे त्यातील त्रुटी, उमेदवारांची सोय- गैरसोय याची पडताळणी करून हा नवा प्रयोग भविष्यात केला जाईल.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) कठीण काळात लाखो सुशिक्षित बेरोजगारांना "एमपीएससी' (MPSC) परीक्षांची वाट पाहावी लागली. संयुक्‍त पूर्व परीक्षेचे अजूनही वेळापत्रक ठरलेले नसून, सरकारमधील रिक्‍त पदांचे मागणीपत्र देखील आयोगाकडे आलेले नाही. कोरोनाच्या संकटाचा अनुभव पाठीशी ठेवून आयोगाने आता भविष्यात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (Video Conference) मुलाखती घेण्याचा विचार सुरू केला आहे. पण, अजून कोणत्याही राज्यातील आयोगाने तसा प्रयोग केलेला नसून केंद्रीय लोकसेवा आयोगानेही (UPSC) तसा प्रयोग केला नाही. त्यामुळे त्यातील त्रुटी, उमेदवारांची सोय- गैरसोय याची पडताळणी करून हा नवा प्रयोग भविष्यात केला जाईल, अशी माहिती आयोगातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. (In future MPSC interviews will be conducted by video conference)

MPSC
"वाझे, देशमुख, सिंग, परब यांच्यानंतर आव्हाड यांचा नंबर !

राज्यातील जवळपास 25 ते 30 लाख विद्यार्थी दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची तयारी करतात. सततच्या नैसर्गिक संकटांमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाकडून ऑनलाइन मुलाखतीचे नियोजन केले जात आहे. एका उमेदवाराच्या मुलाखतीसाठी किमान अर्ध्या तासाचा वेळ लागतो. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात तशी सोय उपलब्ध आहे का, सर्व उमेदवारांच्या मुलाखती त्या ठिकाणी घेणे शक्‍य होईल का, याचा अंदाज आयोगाकडून घेतला जात आहे. तर आयोगाच्या कार्यालयात ते तंत्रज्ञान बसविण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, याचीही माहिती घेतली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आयोगाच्या बैठकीत त्यासंदर्भात थोडीशी चर्चा झाली. आगामी काळात आयोगाच्या माध्यमातून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, ही परीक्षा होताना उमेदवार काही गैरफायदा घेऊ शकतील का, याचाही अभ्यास केला जाणार आहे.

MPSC
मुलीला व्हायचंय पोलिस ! पालकांनी पहाटे विवाह उरकण्याचा काढला मुहूर्त

गर्भवती महिलेच्या मुलाखतीचा अनुभव

दोन वर्षांपूर्वी तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत झालेल्या मुख्य परीक्षेतून मुलाखतीस एक महिला पात्र ठरली. मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील एक उमेदवार गर्भवती असल्याने मुलाखतीसाठी ती उपस्थित राहू शकत नव्हती, या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्या गर्भवती महिलेची संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखत घेण्यात आली होती. या धर्तीवर पहिल्या टप्प्यात कमी पदांच्या परीक्षेसाठी हा प्रयोग केला जाणार असून, हा नवा बदल करण्याची आयोगाची तयारी आहे.

एका पदासाठी 12 विद्यार्थीच पात्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून गट-अ व गट-ब संवर्गाच्या अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठी अंदाजित लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची संख्याही लक्षणीय असते. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी आयोगाकडून चाळणी लावून मेरिटद्वारे एका पदासाठी 12 उमेदवार निवडले जातात. त्यासाठी स्वतंत्र मेरिट यादी जाहीर केली जाते. दरम्यान, आता एका पदासाठी 25 विद्यार्थी करावेत, अशी मागणी केली जात आहे. मात्र, आयोगाने ही मागणी नामंजूर करत तसा बदल करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. एका पदासाठी 12 ते 14 विद्यार्थी निवडले जातील, यावर आयोग ठाम असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com