मोठी बातमी : राज्यातील दीड लाख बालकांना कोरोना

२१ ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण तिसऱ्या क्रमांकावर आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे बाधित होण्याचे प्रमाण ३.०५ टक्के आहे.
Coronavirus
CoronavirusPTI
Summary

२१ ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण तिसऱ्या क्रमांकावर आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे बाधित होण्याचे प्रमाण ३.०५ टक्के आहे.

मुंबई : राज्यात ० ते १० वयोगटातील कोरोनाबाधित मुलांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख ५१ हजार २९५ बालके कोरोनाबाधित झाली असल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. प्रौढ आणि लहान मुलांमधील कोरोना उपचारपद्धती आणि प्रोटोकॉल वेगवेगळा असून त्यानुसार उपचार करण्याचा सल्ला हा टास्क फोर्स देणार आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेत वेगवेगळ्या वयोगटातील नागरिक बाधित झाले आहेत. ३१ ते ४० वर्षे वयोगट सर्वाधिक बाधित असून त्यापाठोपाठ ४१ ते ५० या वयोगटातील कोरोनाबाधितांचे प्रमाण आहे; तर २१ ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण तिसऱ्या क्रमांकावर आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे बाधित होण्याचे प्रमाण ३.०५ टक्के आहे.

Coronavirus
विषाणूंचा वापर जैविक अस्त्रासारखा; चीनचा 5 वर्षांपूर्वीच कट

इतर वयोगटातील नागरिकांच्या बाधितांपेक्षा बालकांचे प्रमाण कमी असले, तरी बालकांना उपचारादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच त्यांच्यावर प्रौढांप्रमाणे उपचार करता येत नाहीत. त्यामुळे पुढील भीती लक्षात घेता बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

कोणत्याही आजाराच्या उपचारामध्ये प्रौढ आणि बालकांचा प्रोटोकॉल वेगवेगळा असतो. लहान मुलांची औषधे वेगळी असतात. त्यामुळे त्यांच्यावरील उपचारासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

- डॉ. अविनाश सुपे, सदस्य, कोव्हिड टास्क फोर्स

Coronavirus
Corona Update : राज्याला दिलासा; दिवसभरात ६० हजारांहून अधिक रुग्ण बरे

राज्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण

वयोगट बाधित टक्केवारी

० ते १० १,५१,२९५ ३.०५

११ ते २० ३,४३,४६१ ६.९३

२१ ते ३० ८,७९,४२७ १७.७५

३१ ते ४० ११,०२,९०६ २२.२६

४१ ते ५० ८,८७,७९१ १८.२१

५१ ते ६० ७,४२,६३६ १४.१९

६१ ते ७० ५,१०,९७३ १०.३१

Coronavirus
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 मे 2021

नवजात बालकांसाठी पालिकेची सुविधा

मुंबईतील प्रमुख रुग्णालयांमध्ये यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह बालकांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मॅटर्निटी वॉर्डसह जम्बो कोविड केंद्रातही बालकांसाठी कक्ष सुरू केला जाणार आहे. मुंबईच्या पूर्व, पश्चिम आणि शहरी भागात २८ प्रसुती रुग्णालयांपैकी काही रुग्णालय कोरोनाबाधित गर्भवती माता आणि बाळांसाठी राखीव ठेवली जातील. नव्याने तयार होणाऱ्या जम्बो कोविड सेंटरमध्येही बालकांसाठी विशेष कक्षाची सुविधा असणार आहे. त्यामुळे भविष्यात बालकांची रुग्णसंख्या वाढल्यास गैरसोय होणार नाही, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com