esakal | महाराष्ट्रात 1050 कोटींचे संशयास्पद व्यवहार; आयकर विभागाचा मोठा खुलासा| Income Tax
sakal

बोलून बातमी शोधा

income tax department

काही सरकारी अधिकाऱ्यांनी विशिष्ट मंत्रालयातील विशिष्ट पद मिळविण्यासाठी मोठी रोख रक्कम दिल्याचे कंत्राटदारांबरोबर व्यवहार झाल्याचेही पुराव्यांमधून दिसून येत आहे.

महाराष्ट्रात 1050 कोटींचे संशयास्पद व्यवहार; आयकर विभागाचा मोठा खुलासा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - प्राप्तिकर विभागाने गेल्या महिन्यात २३ तारखेला राज्यात काही उद्योगपती आणि दलालांच्या, तसेच सरकारी पदांवरील काही जणांशी संबंधित ठिकाणी छापे टाकले. गेल्या सहा महिन्यांत मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने आज जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्राप्तिकर विभागाच्या या पत्रकानुसार, सप्टेंबरमध्ये केलेल्या या कारवाईत २५ निवासस्थाने आणि १५ कार्यालयांमध्ये तपास मोहिम राबविण्यात आली. मुंबईतील हॉटेल ओबेरॉयमधील दोन अलिशान खोल्या दोन दलालांनी कायमस्वरुपी आरक्षित करून ठेवल्या असून त्यांचा वापर विविध प्रकारच्या बैठकांसाठी केला जातो. या ठिकाणीही शोधमोहिम राबविण्यात आली. या सर्व संशयितांनी व्यवहार करताना सांकेतिक नावांचा वापर केल्याचे दिसून आले असून काही व्यवहारांच्या नोंदी १० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांनी एकूण तब्बल एक हजार पन्नास कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचेही आढळून आले आहे.

हेही वाचा: ...अन् भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले!

'हे दलाल विविध कंपन्या आणि उद्योजकांना जमीन मिळवून देण्यापासून ते सर्व सरकारी परवानग्या मिळवून देण्यापर्यंत सर्व प्रकारची सेवा देतात. सर्व संशयितांनी सांकेतिक नावांचा वापर केला असला तरी एक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण हाती लागले असून त्यातून अनेक पुरावे मिळलो आहेत. या पुराव्यांमध्ये व्यवहारात वापरलेली रोख रक्कम, त्याचे वितरण आणि व्यक्ती याबाबत माहिती आहे. काही सरकारी अधिकाऱ्यांनी विशिष्ट मंत्रालयातील विशिष्ट पद मिळविण्यासाठी मोठी रोख रक्कम दिल्याचे कंत्राटदारांबरोबर व्यवहार झाल्याचेही पुराव्यांमधून दिसून येत आहे.

या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरील छाप्याची चर्चा आज सुरू असतानाच पंधरा दिवसांपूर्वीच्या वेगळ्या प्रकरणातील छाप्याची माहिती नेमकी आजच प्रसिद्धीस देण्याचे टायमिंग प्राप्तिकर खात्याने साधल्याचीही चर्चा होत आहे.

loading image
go to top