सेनेत मोठे इनकमिंग होण्याची शक्‍यता 

महेश पांचाळ 
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - नुकत्याच झालेल्या राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले असले तरी, स्वबळावर निवडणुका लढवून भाजपाला टक्कर देणारी शिवसेना आजच्या घडीला राज्यातील सत्तेतून बाहेर पडली नसली तरी, जनतेमध्ये सेनेबाबत निर्माण झालेल्या पोषक वातावरणानंतर, राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते, माजी मंत्री तसेच पुर्वश्रमीचे शिवसैनिक मातोश्रीच्या संपर्कात असल्याची विश्‍वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

राज्यात भाजपाचा वारु रोखण्यासाठी चांगले नेते मंडळी पक्षात येणार असतील तर त्यांना प्रवेश देण्याबाबत आता मातोश्रीला आता सकारात्मक पावले उचलली जाण्याची शक्‍यता आहे. मातोश्रीबरोबर काही कारणास्तव वाद निर्माण होउन काही नेते मंडळींनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. परंतु अन्य पक्षात मोठ्या पदावर काम केल्यानंतरही, सेनेची जुनी कार्यपध्दत आणि सध्या काम करत असलेल्या पक्षाची ध्येय  धोरण आणि कार्यपद्धतीत फरक असल्याने या नेत्यांना कामाचे समाधान लाभत नसल्याची बाब अनेकांनी खाजगीत बोलून दाखवली होती. शिवसेनेसारख्या पक्षात तळागाळातून मोठे पदे मिळवलेल्या नेत्यांची संख्या अधिक आहे. शिवसेना या चार अक्षराने अनेकांना ओळख दिली असली तरी, राज्यात शिवसेनेला जोमाने घौडदौड करण्यासाठी आक्रमक नेत्यांचीही आवश्‍यकता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकतील असे नेते जर सेनेत येणार असतील तर सेनेची ताकद वाढण्यास मदत होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Incoming likely to shiv Sena