
सोलापूर : पावसाळ्याला सुरूवात झाल्याने शेतीत मशागतीची, पेरणीची कामे सुरू झाली आहेत. याचवेळी सापांचा वावर वाढत असल्याने शेतशिवारासह घरातही सर्पदंशाच्या घटना वाढतात. गतवर्षी उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत जिल्ह्यात ३७ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुले नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागानेही सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंधक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत.
यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली. सततचा पूर्वमोसमी पाऊस व त्यातच मॉन्सूनचे आगमन झाल्याने पावसाळ्याला सुरवात झाली आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात शेतीकामाची लगबग सुरू झाली आहे. याचवेळी सापांचाही वावर वाढत असल्याने ग्रामीण भागासह शहरातही सर्पदंशाच्या घटना वाढतात. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने उपचारासाठी मुबलक औषधासाठी उपलब्ध केला आहे. विषारी सापाचा दंश झाल्यानंतर लागणाऱ्या सर्व औषधांचा यात समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालये, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका असल्याने अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घ्यावी लागणार आहे.
‘या’ कारणांमुळे वाढतो सापांचा वावर
सापांचे भक्ष्य उंदीर असून घर, आजूबाजूला स्वच्छता ठेवा, जेणेकरून उंदीर येणार नाहीत. अडगळ, बांधकाम साहित्य, लाकडी वस्तू ही सापाच्या लपण्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे बिळ बुजवून घ्यावीत. अंधाऱ्या जागांमध्ये बेडूक आणि उंदीर असतात. अन्नाच्या शोधात सापासह सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढतो. परिणामी सर्पदंशाच्या घटना वाढतात. सर्पदंशानंतर अघोरी उपचाराऐवजी नजीकच्या सरकारी दवाखान्यात उपचार घ्यावेत.
अशी घ्यावी सर्वांनी काळजी...
घरासह आवारातली अडगळ, जुन्या विटा, दगड या ठिकाणी बेडूक, उंदीर आश्रय घेतात. त्यामुळे अडगळ, जुन्या विटा ठेवू नका.
घराच्या आवारात वाढलेल्या गवतामुळे साप येतात. त्यामुळे गवत वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
बूट घालण्यापूर्वी नेहमी झटकून घ्या.
कुठल्याही अंधाऱ्या किंवा अडचणीच्या ठिकाणी वावर असल्यास टॉर्च वापरावे.
साप दिसल्यास तत्काळ सर्पमित्र अथवा वन विभागाशी संपर्क साधावा.
सर्पदंश झाल्यास तत्काळ शासकीय रूग्णालयात जा.
शासकीय रूग्णालयात सर्पदंशावरील सर्व औषधी उपलब्ध असतात.
प्रमुख विषारी साप....
नाग : फणा काढतो.
मण्यार : काळ्या शरीरावर पांढऱ्या पट्ट्या, सहसा रात्री सक्रिय असतो.
घोणस : पिवळसर रंगाचा व शरीरावर वर्तुळाकार ठसे असतात.
फुरसे : लहान, भुरकट रंगाचा, पण अतिविषारी असतो.
वर्षभरात ९० सर्प, श्वानदंशाच्या घटना
२०२३- २४ या वर्षात सोलापूर जिल्ह्यात सर्पदंशाच्या १०८ घटना घडल्या होत्या. तर २०२४ च्या पावसाळ्याआधी एप्रिल व मे या दोन महिन्यांत जिल्ह्यात ३७ घटना घडल्या होत्या. २०२४ - २५ या वर्षात सर्पदंश व श्नवानदंशाच्या एकूण ९० घटना घडल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सांगितले.
‘या’ सर्पमित्रांशी साधा संपर्क
उत्तर सोलापूर : अनिल घाडगे (९६६५१३५०८८), संतोष धाकपाडे (९७६५४३९९०३), सुरेश क्षीरसागर (९९७०७६८२५५), सूरज बनसोडे (७७७६९७८२७९).
दक्षिण सोलापूर : अली मुजावर (९४२००८८९७८), मधुकर राठोड (९७६७५५४०४७), श्रीकांत बनसोडे (९३७०४३१४७२).
बार्शी : शशिकांत भंगुरे (९०११५००४००), शेखर देशमुख (८४२१२१६८११).
पंढरपूर, सांगोला : जयराम घाटुळे (९०९५७७१००५), अकबर बागवान (९२७००७४७८६), समाधान ओहाळ (७०८३५६१४१४).
अक्कलकोट : यादव होटकर (९९६०११०८९९).
माळशिरस : अमर वाघेला (९७६२७६७६४०).
करमाळा : वैभव वीर (९७६३५६५६६७).
अघोरी उपचार न करता सर्पदंश झालेल्यांनी आरोग्य केंद्रात घ्यावेत उपचार
पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढतात. त्यावर उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्पदंशाची घटना घडल्यास घरगुती अथवा अघोरी उपचार न करता प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
-------------------------------------------------------------------------------------
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराची उत्तम सोय
सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) सर्पदंशावरील औषधांची मुबलक उपलब्धता आहे. रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या बहुतेक रूग्णांचा जीव वाचविण्यात आम्हाला आजवर यश आले आहे. सर्पदंशाच्या रूग्णांसाठी सर्वोपचार रूग्णालयात स्वतंत्र सोय आहे. राज्याच्या तुलनेत सोलापूरच्या सर्वोपचार रूग्णालय सर्पदंशाचे रूग्ण दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. साप चावल्यावर वेळ न दवडता रूग्णाला तातडीने दवाखान्यात दाखल करावे, कारण पहिले काही मिनिटे फार महत्त्वाची असतात.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.