Independence Day : स्वातंत्र्याबरोबरच हवी कर्तव्याची जाणीव; सचिन तेंडुलकर म्हणाला...

आपण ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पूर्वसूरींचे स्मरण करणे आवश्‍यक आहे.
Independence Day
Independence DaySakal

Independence Day - ‘विविधतेत एकता’ या म्हणीमध्ये जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारताचे सार सामावले आहे. आज आपला देश जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे. मात्र, या स्थानावर पोहोचण्यासाठी इतिहासात आपण एक मोठा स्वातंत्र्यलढा दिला आहे.

आज आपण ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पूर्वसूरींचे स्मरण करणे आवश्‍यक आहे. त्यांनी मिळवून दिलेल्या स्वराज्याला ‘सुराज्य’ बनविणे हे आपले कर्तव्य असून, आपण देशाच्या विकासात योगदान द्यायला हवे, याची जाणीव हे स्मरण आपल्याला करून देते.

Independence Day
Independence Day 2023: स्वातंत्र्य दिवसाच्या 'अशा' द्या खास शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

आपल्या विचारधारा आणि मान्यता या भिन्न असल्या तरीही एक समाज म्हणून आपण परस्परांशी आदराने वागतो. आपल्या प्रत्येक कृतीमधून बंधुभाव आणि ऐक्याची भावनाच परावर्तित होताना दिसते. एक क्रिकेटपटू म्हणून खेळताना देखील आम्ही जेव्हा मैदानावर उतरतो,

तेव्हा आम्ही प्रत्येकाच्या भिन्न विचारधारा आणि श्रद्धास्थाने यांना डोक्यात ठेवून एकेकटे खेळत नाहीत तर, आपल्या देशासाठी खेळणाऱ्या अकरा जणांचा संघ अशा ऐक्यभावनेने मैदानात उतरतो.

सामन्यामध्ये भारतीय संघाला प्रोत्साहन देतानाही आपल्या मनात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती असा भेद नसतो, तर भारतीयत्वाची भावना असते. देशाच्या विकासात योगदान देतानादेखील प्रत्येक क्षेत्रामध्ये हीच भावना ठेवून कार्य करणे अपेक्षित आहे.

मी क्रिकेट खेळत असताना मलादेखील, माझी वैयक्तिक ध्येय साध्य करण्यास पूर्ण मुभा देण्यात आली होती. मात्र, त्याचप्रमाणे मला माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव

स्वातंत्र्याबरोबरच हवी कर्तव्याची जाणीव देखील करून देण्यात आली होती. मला माझ्या पद्धतीने खेळण्याचा पूर्ण अधिकार असूनही मला प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार मारता येत नसे. सामन्यातील परिस्थितीनुसार आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मला कधी बचावात्मक खेळावे लागे तर कधी एकेरी धाव घेऊन धावफलक हलता ठेवावा लागत असे.

व्यक्तीगत ध्येय साध्य करण्याऐवजी संघाचा विजय व्हावा, असा व्यापक उद्देश प्रत्येक खेळाडूच्या मनात असे. देशाचे नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य बजावत असताना देखील हीच भावना आपल्या मनात असायला हवी आणि मनात सर्वांबद्दल समान सन्मान असायला हवा.

आपली स्वातंत्र्याची कल्पना ही वर्ण, धर्म, लिंगभेद आणि अन्य सर्व भेदांच्या पलिकडे असून व्यापक आहे. आपल्या देशाने लैंगिक समानतेबाबत संवेदनशीलता आणि सर्वसमावेशकता दाखवत नवी झेप घेतली आहे. याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे, श्रीमती द्रौपदी मुर्मू या देशाच्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. आपल्या देशातील अनेक महिला क्रीडापटू अत्यंत दुर्गम भागांतून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत आहेत.

क्रिकेटमध्ये देखील आता समानता आणि सर्वसमावेशकता आणण्याच्या दृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे समान वेतनासह अनेक सुधारणा करत असल्याचेही आपण पाहत आहोत. विविध क्षेत्रांत अशा पद्धतीने करण्‍यात येणाऱ्या सुधारणा नव्या पिढीला, देशाच्या उन्नतीसाठी आपली जबाबदारी पार पाडण्यास प्रोत्साहित करतात.

‘चांद्रयान-३’च्या यशस्वी प्रक्षेपणासारखे उपक्रम म्हणजे देशाने विकासात एक मैलाचा टप्पा ओलांडला असल्याचे द्योतक आहेत. या मोहिमेत डॉ. ऋतू करिधाल श्रीवास्तव यांसारख्‍या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण वाटा देखील प्रेरणादायी आहे. हे केवळ देशाच्या वैज्ञानिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रगतीचे निदर्शक नसून, आपल्या देशांत सर्वच क्षेत्रांत अमर्याद शक्यता असल्याचेही सिद्ध होत आहे.

Independence Day
Independence Day 2023: स्वातंत्र्यदिन खास बनवायचा आहे ना? मग या टिप्स वापरून मेकअप करून पाहाच!

आपला देश समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत असताना देशाच्या विकासात आपण कसे योगदान देऊ शकतो याची जाणीव देखील आपल्याला व्हायला हवी. एक जबाबदार नागरिक म्हणून देशात होणाऱ्या निवडणुकांत मतदानाचे कर्तव्य बजावणे, हे देशाच्या विकासाठी आणि लोकशाही प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी आवश्‍यक आहे.

मतदानाचे कर्तव्य पार पाडून आपण केवळ आपल्यासाठीच नाही, तर संपूर्ण समाजाच्या हितासाठी जबाबदार नागरिक म्हणून आपले योगदान देऊ शकतो.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून शतकाकडे आणि शतकोत्तर वर्षांकडे वाटचाल करत असताना, देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांनाच देशाप्रती असणाऱ्या आपल्या कर्तव्याची जाणीव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Independence Day
Mumbai News : प्रवाशांची तक्रार ऐकण्यासाठी RPF जवान गेला पण तोल गेला अन् जीव गमावला

आपणही योगदान देऊ शकतो

मतदानाप्रमाणेच अन्य अनेक मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपल्या देशाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतो आणि सामूहिक बदल घडवून आणू शकतो. यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण सुरूवात करू शकतो. जसे की, सर्वांचा सन्मान करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करणे,

आपला भवताल स्वच्छ ठेवणे, जागरूक ग्राहक बनणे आणि ज्येष्ठांची काळजी घेणे यांसारख्या छोट्या छोट्या कृतींमधून आपण सर्वांसाठी पोषक वातावरण निर्माण करून ऐक्याचे दर्शन घडवू शकतो.

या कृती जरी छोट्या छोट्या वाटत असतील तरी त्यामाध्यमातून आपण आपल्या पूर्वसूरींनी मिळवून दिलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यास मोठा हातभार लावू शकतो. विविधतेने नटलेल्या आपल्या देशामध्ये भारताचे नागरिक म्हणून आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याबरोबर आपल्या आपण कर्तव्याची जाणीव ठेवणे हे देखील आपली जाणीव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com