
मुंबई : भारत अणुउर्जेकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असताना महाराष्ट्रात रशियाच्या मदतीने अणुभट्टीचा विकास होणार आहे. यासंबंधीचा करार शुक्रवारी करण्यात आला. थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको, रशियाची रोसातोम शासकीय कंपनी स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर विथ थोरियम फ्युएल यांच्यामध्ये सहकार्य पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.