
इंद्राणी मुखर्जी म्हणाली, भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा; कारण...
मुंबई : मला बाहेर येऊन खूप आनंद झाला. खूपच चांगले वाटत आहे. शेवटी सत्याचाच विजय झाला. भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. न्याय मिळाला उशीर लागतो. मात्र, न्याय मिळतो, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukherjee) दिली. शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora Murder Case) प्रकरणात तिला शिक्षा झाली होती. (Indrani Mukherjee said, Trust the Indian judiciary)
इंद्राणी मुखर्जीला विशेष सीबीआय न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी (ता. २०) मुखर्जीची भायखळा तुरुंगातून सुटका झाली. तब्बल साडेसहा वर्षांनंतर इंद्रायणी मुखर्जी तुरुंगाच्या बाहेर आल्याने आनंदी दिसत होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने याचा उल्लेखही केला.
हेही वाचा: शरद पवारांचे ब्राम्हण महासंघाला चर्चेचे निमंत्रण; शनिवारी होणार बैठक
शीना बोरा (Sheena Bora) हत्याकांडात साडेसहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जील दोन लाखांच्या व्यक्तिगत हमीपत्रावर विशेष सीबीआय कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर इंद्राणी भायखळा तुरुंगातून बाहेर आली. तुरुंगातून बाहेर आल्याने खूप चांगलं वाटत आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा. न्याय नक्की मिळतो. मी आता घरी जात आहे. पुढे जाण्याचा काही प्लॅन नाही. फक्त घरी जायचे आहे, अशी ती (Indrani Mukherjee) म्हणाली.
Web Title: Indrani Mukherjee Trust The Indian Judiciary
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..