esakal | मराठीतून माहिती तंत्रज्ञानाची देवघेव होणार सोपी; MKCL चं ‘आय.टी.त मराठी’ ॲप विकसित

बोलून बातमी शोधा

null

मराठीतून माहिती तंत्रज्ञानाची देवघेव होणार सोपी; MKCL चं ‘आय.टी.त मराठी’ ॲप विकसित

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : सध्या अनेक डिजीटल उपकरणांवर मराठी भाषा वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता मराठीतून इतर कोणत्याही भाषेत आणि अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे ‘आय.टी.त. मराठी’ या ॲपमुळे अगदी सोपे होणार आहे. होय, हे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

मराठी भाषेतून ज्ञान, माहिती तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेतून पोचविण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) प्रयत्न करत आहेत. त्यातील एक भाग म्हणून हे ॲप तयार केले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एमकेसीएलने ॲपची निर्मिती केली आहे.

हेही वाचा: उद्यापासून 18 ते 45 वयोगटालीत लसीकरण नावालाच!

जागतिकीणात मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी हे ॲप सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणार आहे. संगणक, स्मार्टफोन यावर मराठीचा वापर व्हावा, यासाठी हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा एमकेसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावरून विनामुल्य डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती एमकेसीएलतर्फे देण्यात आली आहे.

‘आय. टी. त मराठी’ ॲपचे वैशिष्ट्ये :

  • - गुगलचा वापर करून माहिती शोधणे व मराठी टायपिंग करायला शिकणे

  • - टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे (व्हाइस टायपिंग)

  • - मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे (ट्रान्सलेट)

  • - मराठीतून दैनंदिन जीवन आणि व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या ॲप आणि वेबसाईटचा वापर

  • - सोशल मिडियावर मराठी वापरणे