Dahi Handi : जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार; शासकीय परिपत्रक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

these marathi movie based on krishna janmashatmi dahi handi festival

Dahi Handi: जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार; शासकीय परिपत्रक जाहीर

मुंबई : यंदा राज्यात दहिहंडीचा चांगलाच उत्साह दिसून येत आहे. पण या खेळात अनेकदा अपघातही होतात आणि त्यात गोविंदा गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात. अशा किरकोळ जखमी झालेल्या गोविंदांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली होती. याचं आता अधिकृत शासकीय परिपत्रकही जाहीर झालं आहे. (Injured DahiHandi Govinda will get free treatment Govt official circular announced)

दहीहंडी दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. त्यानुसार आता नगरविकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णयाचं परिपत्रक काढलं आहे.

प्रत्येक वर्षासाठी हा निर्णय लागू होणार

या परिपत्रकानुसार, शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या दहिहंडी उत्सवात सहभाग घेणाऱ्या गोविंदाला दुखापत झाल्यास त्याला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे दवाखाने अशा ठिकाणी निःशुल्क वैद्यकीय उपचार देण्यात यावेत. हा शासन निर्णय कायम असून सन २०२२-२३ पासून प्रत्येक वर्षाच्या दहीहंडी सणासाठी निर्णय लागू असेल. तात्काळ प्रभावानं या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.

निर्णयाचं पालन न झाल्यास कारवाई

या निर्णयाचे पालन न करणाऱ्या तसेच टाळाटाळ करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयातील अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असंही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title: Injured Dahihandi Govinda Will Get Free Treatment Govt Official Circular Announced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..