

Underwater Marvel: INS Guldar Becomes India’s First Underwater Museum
Saka
पुणे : कोकणाच्या पर्यटन क्षेत्राला जागतिक ओळख देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे पाण्याखालचे संग्रहालय उभे केले जाणार आहे. त्यासाठी भारतीय नौदलात तब्बल ४० वर्षे देशाची सेवा करणारी 'आयएनएस गुलदार' युद्धनौकेला अरबी समुद्रात जलसमाधी दिली. पुढील दोन-तीन वर्षात या युद्धनौकेवर समुद्रातील जीवसृष्टी निर्माण होऊन पर्यटकांना अविस्मरणीय असा अनुभव पानबुडीच्या माध्यमातून घेता येणार आहे.