दहावी-बारावी परीक्षेचे गोपनीय साहित्य सुरक्षित ठेवण्याच्या सूचना

राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षेबाबत अजून काही निर्णय झालेला नाही
exam
examexam
Updated on

औरंगाबाद: राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षेबाबत अजून काही निर्णय झालेला नाही (scc and hsc exam). परंतु, परीक्षेचे सर्व साहित्य केंद्रांना देण्यात आले होते. त्यात फक्त औरंगाबाद केंद्रावर साहित्य बाकी होते. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी साहित्य पुरविण्यात आले आहे. त्यांनी ते साहित्य सुरक्षित ठेवावे अशा सूचना राज्य मंडळाच्या बैठकीत करण्यात आल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्रभारी विभागीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.

परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या उत्तरपत्रिकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो; तसेच इतर जे गोपनीय साहित्य आहे त्याचा गैरवापर होऊ नये. यासाठी ज्या ज्या ठिकाणी साहित्य आहे, त्यांनी त्याची गोपनीयता ठेवावी, अशा सूचना अध्यक्ष दिनकर पाटील, सचिव अशोक भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.(instructions to keep confidential material of 10th 12th examination safe)

exam
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बियाणे अनुदानाच्या अर्जासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी यंदा पावणेदोन लाख विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असली आणि बारावीचे पेपर पुढे ढकलेले असले तरी मूल्यमापन आणि पुढील नियोजनाबाबत अजून सूचना नसल्याचे विभागीय शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com