बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखविणारी आंतरराज्य टोळी जेरबंद- निसार तांबोळी

पोलिसांनी सहा जणांना अटक करुन त्यांच्याकडून विस लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याचे नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी (ता. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास पत्रकार परिषदेत दिली.
आयजी निसार तांबोळी
आयजी निसार तांबोळी

नांदेड : हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा आणि वसमत शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये भारताच्या वेगवेगळा भागातील बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून करोडो रुपये लुटणाऱ्या टोळीला नांदेड, मुंबई, दिल्ली आणि लखनऊ या भागातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक करुन त्यांच्याकडून विस लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याचे नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी (ता. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत शहर पोलिस ठाण्यात संतोष बनवारीलाल सरोज रा. बोर्डेपूर, तालुका मच्छली, जिल्हा जोनपुर (उत्तर प्रदेश) याने 2018 साली वसमत (जिल्हा हिंगोली) येथील एका बेरोजगार युवकाला रेल्वेमध्ये शासकीय नोकरी लावून देतो म्हणून वेळोवेळी विविध बँक खात्यामार्फत व नगदी असे दहा लाख रुपये घेऊन अद्यापपावेतो नोकरी न लावता त्याची फसवणूक केली होती. हे लक्षात आल्यानंतर वसमत शहर पोलिस ठाण्यात भादवीच्या कमल 420, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. तसेच फिर्यादीसारख्या अनेक बेरोजगार मुलांची फसवणूक करुन आरोपीतांनी करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे सांगितल्याने गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत होती.

हेही वाचा - आदिवासी भागातील ग्रामास्थांसोबतच शहरी ग्राहकांनाही रानभाज्यांचा मोह पडला आहे

त्यावरुन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, हिंगोली पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी सहायक पोलिस अधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्फतीने गुन्ह्याच्या तपासावर विशेष लक्ष ठेवून तपासा संबंधाने दोन पथक तयार केले. त्यात हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे व त्यांचे सहकारी पोलिस आमदार किशोर कातकडे, विठ्ठल काळे, जयप्रकाश जाडे, वसमत शहरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोदनापोड, पोलिस नाईक संदीप चव्हाण, रवी ठेंबरे, विवेक गुंडरे, बालाजी बोरगावे यांचा समावेश होता.

पोलिस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ता. नऊ जून रोजी रेल्वे स्टेशन परिसर, नांदेड येथे सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी रवींद्र उर्फ राबिंद्र दयानिधी संकुवा (वय 46) वर्षे रा. ओडिसा हल्ली मुक्काम काटेमान्नेवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, अॅड. नरेंद्र विष्णुदेव प्रसाद (वय 55) राहणार लयरोपरुवार तालुका कोपागंज, जिल्हा महू, उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी अनेक मुलांची फसवणूक केल्याची कबुली देऊन त्यांचे इतर साथीदार नांदेड, मुंबई, दिल्ली व लखनऊ या ठिकाणी असल्याचे सांगून संपूर्ण भारतामध्ये शेकडो मुलांचे करोडो रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याची कबुली दिली.

त्यावरुन पोलिस पथकाने सायबर सेलच्या मदतीने ता.11 जून 2021 रोजी नांदेड शहरात सापळा रचून आरोपी सतीश तुळशीराम हंकारे (वय 36) राहणार बोरगाव, तालुका लोहा, हल्ली मुक्काम अहमदपूर जिल्हा लातूर व नांदेड, आनंद पांडुरंग कांबळे (वय 24 ) राहणार अहमदपूर, जिल्हा लातूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यांच्या माहितीवरुन पोलिस भरतीची अकॅडमी चालवून बेरोजगारांना फसवल्याचे सांगितले.

येथे क्लिक करा - जाणून घ्या युरो कप स्पर्धेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे

ता. १३ जून रोजी त्यांना घेऊन पोलिस पथक मुंबई येथे पोचले. तेथे गौत्तम एकनाथ फणसे (वय ५६) रा. वाघणी ता. अंबरनाथ जिल्हा ठाणे यासा ताब्यात घेतले. त्याने मुंबई व परिसरातली अनेक बेरोजगारांना फसविल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकांनी दिल्ली गाठून अभय मेघशाम रेडकर उर्फ राने (वय ४८) रा. मोतीनगर, न्यू दिल्ली मुळ पत्ता शिरोडा ता. वेंगुर्ले जिल्हा सिंधूदूर्ग यास सापळा लावून अटक केली. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोषकुमार सरोज बनवारीलाल सरोज (वय २९) रा. बोडेपूर ता. मच्छली जिल्हा जौनपूर उत्तरप्रदेश यास पकडण्यासाठी पथक रवाना झाले.

त्याला लखनौ येथील एका लाजमधून ताब्यात घेतले. त्याची व राहण्याच्या ठिकाणाची झडती घेतली असता विविध मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकारी यांचे बनावट स्टॅम्प, रेल्वे अधिकारी यांच्या नावाचे बनावट नियुक्तीपत्र, भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकार असे नाव असलेले लिफाफे तसेच बनावट नियुक्तीपत्र तयार करण्यासाठी लागणारा कागद, लॅपटॉप, रेल्वेचे बनावट ओळखपत्र, अनेक मुलांचे बनावट नियुक्तीपत्र, अनेक एटीएम कार्ड, मोबाईल सदर आरोपी त्यांच्या खात्यावर झालेले बँक व्यवहाराचे डिटेल्स असे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

सदर गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत आरोपीतांनी वापरलेली १८ बँक खाती होल्ड करण्यात आले असून त्याचे खात्यावरील 11 लाख रुपये सिल करण्यात आले आहेत. तसेच आरोपींताकडून नगदी 56 हजार रुपये एक कार (आठ लाख रुपये), सात मोबाईल (50 हजार रुपये) असा एकूण वीस लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती श्री निसार तांबोळी यांनी दिली आहे. सदरची फसवणूक ही वरील आरोपी व त्यांचे इतर साथीदार मिळून मागील दहा वर्षापासून महाराष्ट्र, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगाना मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा, दिल्ली पश्चिम बंगाल या राज्यासह इतर अनेक राज्यातील बेरोजगार मुलांची फसवणूक केल्याचे सांगत आहेत.

सदरची कारवाई पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, हिंगोली पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतीन देशमुख, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, वसमत शहरचे पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोदनापोड आणि फौजदार शिससांब घएवारे यांच्या पथकाने केली आहे. या पथकाचे श्री. तांबोळी यांनी कौतुक करुन पारितोषक जाहिर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com