मुंबई - अवास्तव व बेकायदा व्याज आकारणी करून अनेक सावकार गोरगरिबांना लुटत आहेत. त्यामुळेच आता राज्यातील सर्व म्हणजे १२ हजार अधिकृत सावकारांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी व्याजाचा दर ठळक अक्षरात लिहिण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित सावकारांवर कारवाई करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.