राजकीय गणितं बदलली; राधाकृष्ण विखेंच्या अडचणीत होणार वाढ?

सचिन अगरवाल
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

सुत्रांनी दिलेल्या राधाकृष्ण विखेंमुळे भाजपची जिल्ह्यात दयनिय अवस्था झाल्याचा आरोप करत विखेंना आगामी मंत्रीमंडळात स्थान देऊ नये अशी मागणी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं समजतंय. विशेष म्हणजे या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लगेचच विखे पितापुत्रही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले. त्यामुळे नगर भाजपमध्ये विखे पाटील पितापुत्र एकटे पडल्याचं चित्र आहे. 

नव्यानेच भाजपमध्ये दाखल झालेल्या राधाकृष्ण विखेंच्या विरोधात भाजपमधला एक गट सक्रिय झालाय. शनिवारी संध्याकाळी भाजपचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष भानूदास बेरड यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे या पराभूत आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

सुत्रांनी दिलेल्या राधाकृष्ण विखेंमुळे भाजपची जिल्ह्यात दयनिय अवस्था झाल्याचा आरोप करत विखेंना आगामी मंत्रीमंडळात स्थान देऊ नये अशी मागणी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं समजतंय. विशेष म्हणजे या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लगेचच विखे पितापुत्रही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले. त्यामुळे नगर भाजपमध्ये विखे पाटील पितापुत्र एकटे पडल्याचं चित्र आहे. 

या विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपचे जिल्ह्यात ५ आमदार होते. तर काँग्रेस आघाडीचे ६ आमदार होते. मात्र या निवडणुकीत भाजपच्या आमदारांची संख्या घटून ३ वर आलीय. तर काँग्रेस आघाडीने आपली ताकद वाढवत जिल्ह्यातून ८ आमदार निवडून आणलेत. एवढंच काय तर भाजपच्या शिवाजी कर्डिले आणि राम शिंदेंसारख्या दिग्गजांना पराभव पत्करावा लागलाय. 

खरंतर विखे पाटील हे राजकीयदृष्ट्या तालेवार असं घराणं. काँग्रेसमध्ये असतानाही विखे पाटील विरूद्ध इतर असंच राजकीय चित्र नेहमी दिसत असे. आता पक्ष बदलल्यानंतरही विखे पाटलांची स्थिती पुर्वीपेक्षा फारशी वेगळी दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात विखे पाटील पक्षांतर्गत विरोधाचा कसा सामना करतात, हे पाहणं महत्वाचं असेल.

WebTitle : internal conflicts of bjp might affect on radhakrishna vikhe patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: internal conflicts of bjp might affect on radhakrishna vikhe patil