
पाली : बुद्धिबळ हा जगातील सर्वात प्राचीन व बौद्धिकदृष्ट्या समृद्ध खेळांपैकी एक आहे. 20 जुलै हा दिवस जगभरात बुद्धिबळाच्या संस्कृतीला, इतिहासाला आणि शैक्षणिक महत्त्वाला वाहिला आहे. बुद्धिबळाचा उगम प्राचीन भारतातील 'चतुरंग' या खेळापासून झाला असे मानले जाते. हा खेळ इराण, युरोपमार्गे पसरत गेला आणि आधुनिक बुद्धिबळाचे स्वरूप धारण केले.