सदावर्ते-शिरसाटांचा होणार कायदेशीर सामना; काय घडलंय नक्की? जाणून घ्या

स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून धमकावलं
Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarteesakal

Gunratna Sadavarte: शिंदे गटातील आमदार संजय शिरसट यांनी बांधकाम क्षेत्रातील बाब कंस्ट्रक्शन्स या कंपनीला धमकवल्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहे. तर वकील सदावर्ते यांच्याकडे त्यांचा कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा सदावर्ते यांनी केला आहे. आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात न्यायालयात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

निविदा न भरण्यासाठी दबाव आणून, स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून धमकावणे, कामात अडथळा निर्माण करणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायधीशांच्या निवासासाठी इमारत बांधण्यात येत आहे. या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवलेली गेली नाही.

हे कंत्रात 47 कोटी रुपयांचे आहे. मात्र याते कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आले आहे ती अपात्र असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. वर्क ऑर्डर देण्याआधी आमचे पक्षकार बाबा कंस्ट्रक्शन कंपनीला संजय शिरसाट यांच्यापीए ने बोलावून धमकी देण्यात आली. ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात आली आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com