Nawab Malik: नवाब मलिक कायद्याच्या कचाट्यात; जमीन हडपण्याच्या कटात मलिकांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

Nawab Malik: नवाब मलिक कायद्याच्या कचाट्यात; जमीन हडपण्याच्या कटात मलिकांचा सहभाग

मुंबईतील कुर्ल्यातील मुनिरा प्लंबर आणि तिची आई मरिअम गोवावाला यांची जमीन हडप करण्याबाबत हसीना पारकर, सलीम पटेल व आरोपी नवाब मलिक यांनी कट केला होता, असे दाखवणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत', असे निरीक्षण विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपल्या जामीन निर्णयात नोंदवले आहे.

'दाऊदच्या डी या गँगमधील सदस्यांसोबत नवाब मलिक यांनी एकमत करून गोवावाला कंपाऊंड ही जमीन हडप केली आहे अशा आरोपाखाली ईडीने मलिक यांच्याविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांना 23 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

'ईडीने पीएमएलए कायद्याच्या कलम ५०अन्वये साक्षीदारांचे जबाब व तपासाच्या दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सर्व आजही मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची कंपनी सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. ही मालमत्ता घेण्याबाबत सलीम पटेल याच्यांसोबत अर्जदाराचे व्यवहार व एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन ईडीकडून पीएमएलए कायद्यातील तरतुदी लावणे उचित आहे', असे निरीक्षणही न्या. रोकडे यांनी आपल्या 43 पानी निकालामध्ये नोंदवले आहे.

हेही वाचा: Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असणारे माजी कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने 30 नोव्हेंबरला फेटाळला आहे. या निर्णयाचे पत्रक मंगळवारी उपलब्ध झाले आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले मलिक हे सध्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल आहेत.

हेही वाचा: Nawab Malik : नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं फेटाळला जामीन

टॅग्स :Courtnawab malik