Covid 19 Fourth Wave | "राज्यात कोरोनाची चौथी लाट..."; राजेश टोपेंचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope
"राज्यात कोरोनाची चौथी लाट..."; राजेश टोपेंचं मोठं विधान

"राज्यात कोरोनाची चौथी लाट..."; राजेश टोपेंचं मोठं विधान

राज्यातल्या कोरोना परिस्थितीबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. राज्यातल्या रुग्णवाढीची गती अतिशय कमी आहे, अशी माहिती त्यांनी दिली असून ठराविक जिल्ह्यांमध्येच रुग्णवाढ होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात कोरोनाची चौथी लाट(Covid 19 Fourth Wave) येत आहे का, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "रुग्णांची वाढण्याची गती अतिशय कमी आहे. साधारण सव्वाशे-दीडशे केसेस ठराविक जिल्ह्यात आढळत आहेत. त्याचा अर्थ असा नाही ही घाबरण्याचं काही कारण आहे, किंवा आता चौथी लाट येणारच आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) सगळ्या आरोग्यमंत्र्यांची बैठक झाली. त्या दिवशी आमची सर्वच संबंधितांशी चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं की, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये रुग्ण वाढतायत. पण हा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. रुग्ण रुग्णालयात दाखल होत नाहीयेत. घरीच उपचार घेत आहेत".

काळजी करण्याचा विषय नाही. महाराष्ट्रात तुलनेने एवढी रुग्णवाढ नाही. पण आपण दररोज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जर मोठी रुग्णवाढ झाली, तर आय़सीएमआर(ICMR), केंद्र सरकारच्या सूचनांनुसार अंमलबजावणी केली जाईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Web Title: Is There Any Possibility Of Fourth Wave Rajesh Tope Says

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top