26/11 हल्ला : नांगरे पाटलांच्या बॉडीगार्डला बाहेर आणणारे जगदेवप्पा झाले PSI

पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत जगदेवप्पा पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातलीये.
Jagdevappa Patil PSI
Jagdevappa Patil PSIesakal

नाशिक : पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत अक्कलकोट तालुक्यातील जगदेवप्पा पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातलीये. २००४ मध्ये राखीव पोलीस दलात भरती झालेले जगदेवप्पा २००६ पासून पोलीस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा देत होते. जगदेवप्पा यांनी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यादरम्यान विश्वास नांगरे पाटील यांच्या सुरक्षा रक्षकाला ताज हॉटेलमधून बाहेर काढले होते.

9 वेळा बजावली नक्षलग्रस्त भागामध्ये उत्कृष्ठ सेवा

अक्कलकोट तालुक्यातील सुलेट जवळगे येथील मूळचे रहिवाशी असलेले जगदेवप्पा पाटील हे २००४ मध्ये सोलापूर राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले होते. गेल्या १८ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात जगदेवप्पा यांनी नऊ वेळा नक्षलग्रस्त भागामध्ये सेवा बजावताना उत्कृष्ठ कामगिरीची नोंद केली आहे. तर, मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते ताज हॉटेल येथे बंदोबस्ताला होते. मुंबईचे तत्कालिन अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांचा सुरक्षारक्षक व पोलीस शिपाई राहुल शिंदे हे या हल्ल्यात शहीद झाले होते. त्यांना जगदेवप्पा यांनीच बाहेर आणले होते. २००६ पासून ते खातेंतर्गंत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा देत होते. २०११ मध्ये त्यांना यश मिळाले.

Jagdevappa Patil PSI
पोलीस उपनिरीक्षक दीक्षांत सोहळा; खडतर मेहनतीमुळेच पदाला गवसणी

फौजदार झालेलो पाहायला वडिल आज हवे होते...

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यावेळी गडचिरोली येथे कर्तव्यावर होते. मैदानी तयारीसाठी त्यांना अवघ्या १५ दिवसांचा अवधी मिळाला होता. मात्र कठोर मेहनत व जिद्दीच्या बळावर त्यांनी यश मिळविले. फौजदार झालेले पाहण्याचे भाग्य त्यांच्या वडलांना मिळाले नाही, याची त्यांना खंत वाटते. जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

Jagdevappa Patil PSI
नाशिकमध्ये घडली 'अशी ही बनवा बनवी'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com