

Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. येत्या १० एप्रिल रोजी दोघांचा साखरपुडा होणार असून शरद पवारांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे.