Sat, May 28, 2022

जळगाव - टँकरमध्ये दूध भरत असताना पाच जणांचा मृत्यू; ट्रकची जोरात धडक
जळगाव | टँकरमध्ये दूध भरत असताना पाच जणांचा मृत्यू; ट्रकची जोरात धडक
Published on : 13 May 2022, 4:57 am
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरजवळ झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. पहाटेच्या वेळी महामार्गावर हा अपघात झाला. दूधाच्या टँकरला ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे.
दुधाचा एक टँकर रस्त्यातच बंद पडला होता. त्यामुळे बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध भरण्याचं काम सुरू होतं. यावेळी एक ट्रक येऊन या टँकरला धडकला आणि यात ५ कामगारांचा मृत्यू झाला. या मृतांची माहिती अद्याप उपलब्ध नाहीत. मुक्ताईनगर परिसरात महामार्गावर हा अपघात झाला असून पंचनामा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुक्ताईनगरजवळच्या घोडसगाव परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
Web Title: Jalgaon Accident Milk Tanker To Truck 5 Died
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..