महाराष्ट्र राजकीय स्कँडल: जळगाव 'ब्ल्यू फिल्म' प्रकरणाने अख्खा देश हादरलेला

लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग याला कंटाळून पीडित तरूणींनी हिम्मत दाखवली आणि समोर आलं हादरवणारं जळगाव सेक्स स्कँडल
 Jalgaon Sex Scandal 1994
Jalgaon Sex Scandal 1994 SAKAL

शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हलत नाही असं म्हणतात. पण गेल्या दोन तीन वर्षात राज्यात अनेक नेत्यांवर त्यांच्या चारित्र्यावर जोरदार आरोपसत्र सुरु झालंय. माजी वनमंत्री संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यापासून ते माजी आमदार विजय शिवतरे, सेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यापर्यंत कित्येक जणांवर अनैतिक प्रेमसंबंधांचे आरोप झाले. सध्या भाजप नेते गणेश नाईक यांचं लैंगिक शोषणाचं प्रकरण गाजत आहे. या आरोपांचा खरेखोटेपणा अजून सिद्ध झालेला नसला तरी हे आरोप महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नैतिकतेचा घसरता आलेख दाखवत आहेत. स्वच्छ चारित्र्य ही एकेकाळच्या राजकारणाची ओळख असली तरी पूर्वी देखील अशा काही घटना घडून गेल्या होत्या. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अशाच काही गाजलेल्या पॉलिटिकल स्कॅन्डलबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

माणसं शिकली, सवरली तशी गावं ओस पडू लागली अन् शहरं गजबजून गेली. सोन्याच्या भावानं जमिनी व मातीमोलानं माणसं विकली जाऊ लागली. याचा फायदा उठवून धनदांडगे झालेल्या राजकारण्यांनी मस्ती जिरवण्यासाठी शहरातील तरुणींना वेठीस धरले... त्यातून उभे राहिले भीषण नाटय... जळगावबरोबरच महाराष्ट्राला हादरा देणारे... ब्ल्यू फिल्म प्रकरण.(Jalgaon Sex Scandal 1994)

साल होते 1994, ठिकाण होते जळगाव. इथल्या बसस्थानकाजवळ असलेल्या हॉटेल तिरुपती समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणींसमवेत काही तरुण आपली छायाचित्रे काढून घेत. ती दाखवून तरुणींना ब्लॅकमेल केले जाई. त्यांचे शीलहरण केले जाई. हॉटेल तिरुपती मधील एका खोलीत या कृत्यासाठी जणू रंगमहालच सजविण्यात आला होता. तरुणींवर तेथे आळीपाळीने चालणाऱ्या बलात्काराचे व्हिडिओ चित्रीकरणही केले जात असे.

'जळगाव कॅसेट' नावाने ते आंबटशौकिनांच्या घरी पोहोचले. यात सर्व थरांतील लोक होते, हे विशेष. या उद्योगात काही राजकारण्यांचा देखील समावेश होता. तत्कालीन नगरसेवक पंडित सपकाळेने रुग्णालयात नोकरी लावून देतो, कॉलेजात फुकट प्रवेश देतो, पालिकेतील कामे करून देतो, अशा थापा मारून त्याने कित्येक तरुणींना आकर्षित केले. त्यांच्या असहायतेचा फायदा उठवून बलात्कार केला व त्याचे चित्रीकरण केले. कॉलेज कॅम्पस, ब्युटी पार्लर आईस्क्रिम पार्लर, बस स्थानक या ठिकाणी येणाऱ्या शाळेतील विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरूणी आणि महिलांवर नजर ठेऊन असत. त्यातील काहिंना हेरून त्यांना गुंगीचं औषध देऊन त्या मुलीवर/महिलेवर लैंगिक अत्याचार केले जात होते. या तरूणींना नंतर मोठमोठे व्यापारी, राजकारणी अशा लोकांशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात होते.

लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग याला कंटाळून काही पीडित तरूणींनी हिम्मत दाखवून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. जळगावचे पोलिस अधीक्षक असतानाच्या काळात दीपक जोग यांनी तडवी व सपकाळेची काळी कृत्ये उजेडात आणण्याचे धैर्य दाखविल्याने असंख्य तरुणी शिकार होण्यापासून बचावल्या. आतापर्यंत सात आठ आरोपींना पकडण्यात आले. साधारण हे स्कँडल तीन ते पाच वर्षापासून सुरू होतं. या स्कँडलमध्ये साधारण 300 ते 500 महिला अडकल्याचा दावा त्यावेळी काही वृत्तसंस्थांनी केला होता.(Jalgaon Sex Scandal A Dark History)

पोलीस तपासात अनेक तरुणींचे आक्षेपार्ह फोटो सापडले. 1997 ला प्रकरणांमध्ये पाच आरोपींना शिक्षा करण्यात आली. 2000 मध्ये मुख्य आरोपी आणि काँग्रेस नेता पंडित सपकाळे याची सुटका करण्याच आली मुख्य आरोपी आणि काँग्रेसचे नेते पंडित सपकाळे याची 2000 मध्ये सुटका करण्यात आली. तोपर्यंत त्याने चार वर्षांचा कारावास भोगला होता. सपकाळे विरोधातले पुरावे नैसर्गिक व विश्वसनीय नसल्याचं हायकोर्टाने सांगितले होतं. पंडित सपकाळे याच्या सुटकेनंतर हजारो महिलांकडून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जळगावात सपकाळेला प्रवेश दिला जाऊ नये अशी लेखी मागणी करण्यात आली होती. त्याचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला. हे प्रकरण जसं जसं समोर आल्यानंतर एक एक गोष्टी उघड होऊ लागल्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्नाला सुरुवात झाली. मात्र काही महिला संघटनानंनी या विरोधात जोरदार आंदोलन पुकारली.

जळगावच्या सेक्स स्कँडलमध्ये अनेक महिला, मुली याचे शोषण करण्यात आले. यातल्या अनेक मुली या अल्पवयीन वयोगटातल्या होत्या परंतु या ऐकीनीही समोर येण्याची हिंमत दाखवली नाही. या प्रकरणाचा तपास अरविंद इनामदार, मीरा बोरवणकर आणि दीपक जोग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास समितीकडून करण्यात आला होता. पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करून न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी ही सुनावणी घेतली.(Scandal Dark History)

जळगाव आणि भुसावळ या दोन शहरांमध्ये एकूण 12 बलात्कार व 20 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्याहून अधिक महिला आणि मुली याच्यावर लैंगिक शोषण करण्यात आले होते. मुलींना गुंगीचं औषध द्यायचं त्यानंतर त्यांचे नग्न अवस्थेत फोटो काढायचे त्यानंतर ब्लॅकमेल करून त्यांना बडे व्यावसायिक, राजकारणी, डॉक्टर यांच्याशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात होते. अत्यंत भयंकर अशा या स्कँडलमध्ये राजकारणी,वकील, डॉक्टर अशा समाजातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्गाचे हात मलीन झाले होते. तक्रारी उशिरा नोंदवल्या गेल्यामुळे या सेक्स स्कँडलमध्ये मुख्य अडसर ठरला. FIR दाखल होऊन खटला सुरू होईपर्यंत एक वर्ष निघून गेलं होते. त्यामुळे वैद्यकीय अहवालांची कमतरता होती. याची कल्पना असतानाही आम्ही कोर्टात गेलो असं त्यावेळी मीरा बोरवणकर यांनी म्हटलं.

शेवटी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला असला तरी अद्याप महिलांना आवश्यक सुरक्षा पुरवण्यास प्रशासन सक्षम दिसत नाही. आजही अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडताना दिसून येतात. त्यामुळे या जळगाव सेक्स स्कँडल मधून आपण काही धडा घेतला की नाहि?हा सवाल आज उपस्थित होतोय.(Dark History 1994 Infamous Case Maharashtra)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com