
मुंबई : राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकामुळे राज्यातील विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केले. विशेष म्हणजे राज्यातील आदिवासीबहुल पण मागास असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा विकास होऊ शकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.