43 साखर कारखान्यावर कारवाई करा; राजू शेट्टींची मागणी

Raju Shetti criticized Maharashtra government over APMC decesion
Raju Shetti criticized Maharashtra government over APMC decesion

कोल्हापूर: राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून साखर कारखान्यावर कारवाई केली जाते. एकच नाही तर 43 साखर कारखान्यावर ती कारवाई झालीच पाहिजे अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju shetti) यांनी केली आहे. ईडीनं अजित पवार यांच्या निकटवर्तीय यांचा जरंडेश्वर कारखान्याला (Jarandeshwar sugar factory)सील केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे. पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी माहिती दिली.ईडी कडून केली जाणारी कारवाई राजकीय दबाव वाढवण्यासाठी केली जाते. असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. (Jarandeshwar-sugar-factory-ed-action-speech-on-raju-shetti-kolhapur-news)

राजू शेट्टी म्हणाले, मी अनेक दिवसांपासून सांगत आलो आहे कि ईडी, इन्कम टॅक्स, सी बी आय ही केंद्र सरकारच्या हातातली हत्यार झाली आहेत. आणि त्याचा उपयोग राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठी सातत्याने होत आहे. त्यातलाच हा प्रकार दिसतोय. महाराष्ट्रातले एकूण 43 साखर सहकारी कारखाने कवडीमोल किमतीने विकले गेले. त्याला जबाबदार असणाऱ्या 89 व्यक्तींविषयी मी मुंबई उच्च न्यायालयात पाच वर्षांपूर्वी याचिका दाखल केली आहे. मात्र याची चौकशी झाली नाही. हाय कोर्टाने मला एफआयआर दाखल करण्यासाठी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही.

मी ईडीच्या दारात हेलपाटे घातले. इन्कम टॅक्स विभागाकडे सातत्याने गेलो. सीबीच्या दारात हेलपाटे घातले. त्यावेळी कोणत्याही यंत्रणेने माझ्याकडे लक्ष दिले नाही. 43 सहकारी साखर कारखाने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे साखर कारखान्याच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे.जेव्हा मी पुरावे सादर केले तेव्हा ईडी झोपली होती काय? असा प्रश्‍न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी कारखान्यावर दरोडा टाकला आहे. म्हणूनच 43 साखर कारखान्यावरती कारवाई करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com