पुलवामातील चकमकीत पानगाव येथील जवान शहीद 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

पानगाव (सोलापूर) ः जम्मू-काश्‍मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील बंडजू प्रांतात आज पहाटेच्या सुमारास अतिरेक्‍यांशी झालेल्या चकमकीत पानगाव (ता. बार्शी) येथील सी. आर. पी. एफचे जवान सुनील काळे हे शहीद झाले आहेत.

या चकमकीत दोन अतिरेक्‍यांचा देखील खात्मा झाला आहे. शहीद काळे हे सी. आर. पी. एफ, बी. एन. तुकडीत कार्यरत होते. दरम्यान आज पहाटे सुनील यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी गावातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवले आहेत. काळे हे 2000 मध्ये सी. आर. पी. एफमध्ये भरती झाले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jawan martyred at Pangaon in an encounter in Pulwama