शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे ध्येय

Jayant-Patil
Jayant-Patil

सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक विकास साधताना शेवटच्या घटकाला न्याय मिळेल हे ब्रीद या सरकारने समोर ठेवले आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असा मला ठाम विश्वास आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला या सरकारचे सुरुवातीपासूनच प्राधान्य राहिलेले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या शांत, संयमी व सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेल्या नेत्याच्या नेतृत्वात हे सरकार यशस्वी कारभार करत आहे.  खरे सांगायचे तर कोरोनाच्या महासंकटात आमच्या सरकारने ज्या पद्धतीने अत्यंत सुनियोजितपणे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.

हे सरकार स्थापन होत असतानाच तीन पक्षांच्या समान किमान कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकार सत्तारूढ झाले. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक विकास साधताना शेवटच्या घटकाला न्याय मिळेल हे ब्रीद या सरकारने समोर ठेवले आहे. महाविकास आघाडीने केलेल्या शेतकरी कर्जमाफीत कुठल्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही. अत्यंत पारदर्शकपणे कर्जमाफीची अंमलबजावणी झाली आहे. तब्बल तीस लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कुठल्याही प्रकारच्या अटी व शर्ती लागू न करता न्याय मिळाला आहे. हे महाविकास आघाडीचे सर्वाधिक यश आहे. 

याशिवाय सामाजिक न्याय असेल, जलसिंचन असेल शेती आणि उद्योग याबाबतीत महाविकास आघाडी सरकारने एका वर्षात दमदार सुरुवात केली आहे. पण, कोरोनाच्या संकटाने आर्थिक संतुलन आणि महसुली जमा यामध्ये प्रचंड मोठी तफावत आल्याने काही विकासकामांवर अंकुश लावणे वेदनादायक वाटते. तरीही आरोग्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षा देणे आणि कोरोना सारख्या महा संकटावर मात करणे हे या वर्षभरातील सर्वांत मोठे आव्हान होते. महाविकास आघाडी सरकारमधील सर्वच नेत्यांनी आणि पक्षांनी या आव्हानाचा सामना करताना दाखवलेला संयम आणि संतुलन हे खरच एक आदर्शवत असेच आहे. 

पवारांचे मार्गदर्शन मोलाचे
राष्ट्रवादी काँग्रेस,  काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाच्या सर्व भूमिका आणि समन्वय साधण्यात महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे निश्चित या सरकारला मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळेच विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला तरी महाविकास आघाडीच्या सरकारमधील समन्वय कायम आहे. आणि या समन्वयाला संयमी नेतृत्व असलेल्या उद्धव ठाकरे यांची जोड मिळाल्याने हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असा मला ठाम विश्वास आहे.

विकास चक्राला गती देणार
महाराष्ट्रातील जनतेला स्थिर सरकार देणे आणि विकासाच्या नवीन संकल्पना राबवून विद्यार्थी, शेतकरी, कामगार, उद्योजक,  महिला या वर्गांना न्याय मिळवून देणे हे या सरकारचे सर्वाधिक महत्वाचे धोरण राहणार आहे. कोरोनाच्या संकटावर मात केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारचे राज्याच्या आर्थिक प्रगतीचे, कृषी विषयक धोरणांचे आणि औद्योगिक विकासाचे चक्र गतीने फिरेल यासाठी ठोस धोरण हाती घेतले आहे. अनेक प्रकारचे नवीन धोरणात्मक निर्णय घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या या धोरणावर जनतेचा विश्वास आहे. नागरिकांच्या या प्रतिसादाला हे सरकार कायम कटिबद्ध राहून विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतशील राज्य म्हणून कायम आपले स्थान बळकट करेल असा मला विश्वास आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com