Jayant Patil l भाजप मनसेचा वापर करतयं; जयंत पाटलांचा आरोप

मनसेला जवळ केल्यावर भाजपला फटका बसू शकतो म्हणूनच...
Jayant Patil
Jayant Patilesakal

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Shard Pawar) यांच्या घरावर हल्ला झाला. एसटी कर्मचाऱ्यांना भडकावल्याच्या ठपका ठेवत कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. यावर पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज रायगड जिल्हा दौरा करणार असून पुणे शहर आणि कार्यकारीणीची बैठक होणार आहे. त्यांचा सातारा, सांगली, आणि कोल्हापूर दौरा असून कोल्हापूरला २३ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत परिवार संवादाच्या कार्यक्रमाचा आढावा तसेच समारोपाचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील योग्य ती माहिती घेवून कारवाई करतील. तपास कोणत्या दिशेला जातोय या संदर्भात मला कोणतीही माहिती नसल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्रातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हे सर्व घडवण्यासाठी मागे कोण होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. या आंदोलनाला खतपाणी कोणी घातलं, यामध्ये प्रक्षोभक भाषणे कोणी केली, न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते, आंदोलन करण्यासाठी भाग पाडणारी लोकं कोण होती याचा शोध घेण्याची आवश्यकता सगळ्यांनी व्यक्त केली आहे. गृहमंत्री यावर नक्कीच कारवाई करतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

भाजप आणि मनसे यांची जवळीक वाढली आहे यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजप आणि मनसे एकत्रीत आहेतच. फक्त मुंबईत हिंदी भाषिकांची मते मिळणार नाहीत म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजप घाबरत आहे. मनसेला जवळ करण्याची इच्छा आहे मात्र भाजपचे धाडस होत नाही. मनसेला जवळ केल्यावर भाजपला फटका बसू शकतो म्हणूनच मनसेचा वापर भाजप करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Jayant Patil
पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी काहीजण ताब्यात; पत्रकारही रडावर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीला करारा जवाब मिलेगा असा टीझर जाहीर केला आहे. यावर पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हा काही महत्वाचा विषय नाही. योग्यवेळी उत्तर देऊ.

कोळसा उपलब्ध होत नाही असे काही प्रश्न निर्माण झाले असून, कोळसा मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकार पूर्ण लक्ष देत असून तयारीनिशी काम करत आहे. ऊर्जामंत्री लक्ष घालत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com