ईडी, भोंगा, हनुमान चालिसाच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न : जयंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

'राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे आघाडी शासन राज्यात लोकाभिमुख काम करीत आहे.'

'ईडी, भोंगा, हनुमान चालिसाच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न'

पाटण (सातारा) : राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) व शिवसेना (Shiv Sena) या तीन पक्षांचे आघाडी शासन राज्यात लोकाभिमुख काम करीत आहे. मात्र, विरोधक ईडी, सीआयडी, भोंगा वाजवा, भोंगा काढा, छापेमारी, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. रोजगार व वाढलेली महागाई याकडून लक्ष विचलित करुन जनतेत अस्थिरता निर्माण करीत आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

हेही वाचा: राजकीय उलथापालथ होणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्षानं घेतली शरद पवारांची भेट

येथील श्रीमंत रणजितसिंह पाटणकर स्मारक मंदिर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil), आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), सत्यजितसिंह पाटणकर, माहिती तंत्रज्ञान प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सलक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, रविकांत करपे, सुनील गव्हाणे, बलराज पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधण्यासाठी ही परिवार संवाद यात्रा सुरू आहे. पक्ष राज्यात सर्वात मोठा असला पाहिजे, याची खुणगाठ ठेवून कार्यकर्त्यांनी बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून मंत्री पाटील म्हणाले,‘‘ कार्यकर्त्यांनी अपेक्षा सांगितल्या. सहयोगी पक्षाच्या नेतृत्वाकडून होणारा त्रास सांगितला. हा विषय गांभीर्याने घेऊन महाआघाडीच्या बैठकीत यावर योग्य तोडगा काढला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून सत्यजितसिंह पाटणकर व कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहिल.’’

हेही वाचा: उदयनराजेंच्या साताऱ्यात सदावर्तेंनी उडवली 'कॉलर'; दिलं थेट चॅलेंज

पालकमंत्री पाटील म्हणाले,‘‘ पाटण तालुक्यातील अनेक प्रश्नांबाबत सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsingh Patankar) दक्ष असतात. आपत्ती काळात मी ते जवळुन पाहिले आहे. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना माजी कायम सहकार्याची भूमिका असते.’’ खासदार पाटील म्हणाले,‘‘ दुर्गम भागातील आमचा तालुका कायम शरद पवारांच्या विचारांचा पाईक राहिला आहे. यश अपयश येत रहाते मात्र लोकांच्या मनात अढळ स्थान विक्रमसिंह पाटणकर यांनी निर्माण केले. तोच वसा सत्यजितसिंह पाटणकर यांनी चालविला असून आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, राजाभाऊ शेलार, सुभाष पवार, बाळा कदम यांनी आपल्या अडचणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घातल्या. मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उपस्थितांचे स्वागत राजाभाऊ शेलार यांनी केले व आभार सुभाष पवार यांनी मानले.

Web Title: Jayant Patil Criticizes Bjp At Patan Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top