अमित शाहांची भेट घेतल्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'बाहेर येताच दिली प्रतिक्रिया...

 jayant Patil
jayant Patilesakal
Updated on

मुंबईः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल पुण्याच्या दौऱ्यावर होते. जयंत पाटील यांनी शाहांची रात्री भेट घेतली, अशा चर्चा दिवसभर रंगल्या होत्या. परंतु दोन्हीकडच्या नेत्यांनी त्या वावड्या होत्या, असं सांगून विषय संपवला. मात्र आज जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या.

मागच्या दोन-तीन दिवसांपासून जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार, अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यातच अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर होते. जयंत पाटील त्यांना भेटले, अशा चर्चा सुरु झाल्या. काल जयंत पाटलांनी अमित शाहांची भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं.

 jayant Patil
गोफण| नमोभाईंची 'ही' खेळी दादारावांना पटली नाही

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देतांना, भेटीचा मुद्दा फेटाळून लावला. पतंग उवणारांनी खात्री करावी, बातम्या पसरवतांना तारतम्य बाळगावं; असं त्यांनी स्पष्ट केलेलं. जयंत पाटील यांनी तर परवा रात्री कुठे होतो आणि कोणते नेते सोबत होते, हेदेखील सांगितलं होतं.

दरम्यान, आज सायंकाळी जयंत पाटील हे 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. बैठक आटोपून जयंत पाटील बाहेर येताच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ही फक्त सदिच्छा भेट होती.

 jayant Patil
Mumbai-Pune Expressway : 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर कंटेनर पलटला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प

पुढे बोलतांना पाटील म्हणाले, ३१ आणि १ तारखेला इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. त्या बैठकीच्या व्यवस्थेसंदर्भात आमच्यात चर्चा झाली. बाकी कोणतीही चर्चा झाली नसून ही फक्त सदिच्छा भेट होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com