Jitendra Awhad Video: ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला; संभाजीराजे छत्रपतींवर केलेलं 'हे' विधान भोवलं
Jitendra Awahad Car Attack: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर ठाण्यामध्ये हल्ला झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत केलेलं विधान त्यांना भोवलं असून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली.
''छत्रपती संभाजी महाराज यांचं रक्त हिरवं आहे का?'' असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडून घोषणाबाजी केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे.
काय म्हणाले होते आव्हाड?
विशालगडावरील हिंसाचाराच्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, तिथे जे काही झालं त्याला कारणीभूत संभाजीराजे छत्रपती आहेत. ११ वर्षापूर्वीच्या दर्ग्यावरील घुमट तोडला.. दहशतवाद्याप्रमाणे त्यांनी प्रवेश करत तोडफोड केली. ही तोडफोड शंभर टक्के संभाजीराजेंमुळे झाल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता.
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यामध्ये आमदारदेखील सुरक्षित नाहीत.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हे सगळं घडत असल्याचं विधान पटोलेंनी केलं.
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी जात असताना हा हल्ला झाला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. विशेष म्हणजे आव्हाडांच्या ताफ्यामध्ये पोलिसांची गाडी होती. तरीही हा हल्ला झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.