esakal | मंत्री जितेंद्र आव्हाडांना मारहाण प्रकरणात अटक: किरीट सोमय्या
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

मंत्री जितेंद्र आव्हाडांना मारहाण प्रकरणात अटक: किरीट सोमय्या

sakal_logo
By
सुधीर काकडे

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून दिली आहे. किरीट सोमय्या यांनी दिलेल्या या माहितीनं राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी अनंत करमूसे यांचं अपहरण करून मारहाण झाल्याच्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी अनंत करमूसे यांचं अपहरण करून मारहाण झाल्याच्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. "अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली" असं ट्विट करत सोमय्या यांनी ही माहिती दिली. मागच्या सव्वा महिन्यापासून ठाकरे सरकार हे आव्हाडांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतं, मात्र शेवटी आज आव्हाड यांना अटक केली असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक करून जामीनावर सोडल्याचं देखील समजतं आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं होतं. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी आनंत करमूसे यांना आपल्या घरी आणून आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मारहाण केल्याचा आरोप करमूसे यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एप्रिल २०२०मध्ये ५ जणांना अटक केली होती. त्यानंतर थेट आज जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना १० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला.

loading image
go to top