
आव्हाड म्हणाले, राज ठाकरेंना वाटते की ते बाळासाहेब होऊ शकतात, म्हणून...
धार्मिक स्थळ अधिकृत की अनधिकृत या वादात मला पडायचं नाही. कारण, महाराष्ट्रात हा वाद खूप मोठा होतो. धार्मिक स्थळाचा वाद हा नेहमीच मोठा होतो. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अचानक वाटायला लागले की ते बाळासाहेब होऊ शकतात. यामुळेच त्यांनी भोंग्यांचा विषय उकरून काढला, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मशिदींवरील भोंग्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणत आहे. ते असे म्हणत आहे याचा मला खूप आनंद झाला. कारण, भोंग्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात दंगे होतील, जाळपोळ होतील अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती. मात्र, तसे काहीही झाले नाही. यामुळे ते आंदोलनाला यश आले असे म्हणत आहेत तर चांगलेच आहे, असेही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.
हेही वाचा: २ ते १८ वयोगटातील मुलांवर बूस्टर डोसची चाचणीची DCGI कडे मागितली परवानगी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. बुद्धांसारखा दुसरा कोणी झाला नाही. सम्राट अशोकांसारखा दुसरा कोणी झाला नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भोंग्यांच्या विषय काढण्यात आला आहे. कितीही केले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांसारखे होऊ शकत नाही, असेही जितेंद आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.
Web Title: Jitendra Awhad Raj Thackeray Hanuman Chalisa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..