esakal | समाजातील राग बघून मोदी पळाले : जितेंद्र आव्हाड
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

‘येत्या रविवारपासून मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील सर्व अकाउंट्स बंद करू इच्छितो, लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करेन,’’ असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

समाजातील राग बघून मोदी पळाले : जितेंद्र आव्हाड

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : समाजातील राग बघून मोदी पळाले, सोशल मिडीयावर द्वेष पेरला तो उगवला, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

‘येत्या रविवारपासून मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील सर्व अकाउंट्स बंद करू इच्छितो, लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करेन,’’ असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. डिजिटल इंडियाचा पाया रचणाऱ्या आणि सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या जागतिक नेत्यांपैकी एक नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते. महत्त्वाचे म्हणजे २०१४ मध्ये भाजपने सोशल मीडियाच्या आधारावरच निवडणूक जिंकली होती. मात्र, आता याच माध्यमातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे ट्विट मोदींनी केल्याने खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षांकडून मोदींच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. आव्हाड यांनीही मोदींनी समाजातील राग पाहून पळ काढल्याचे म्हटले आहे. आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, की सोशल मीडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय पण नोटबंदी मात्र क्षणात केली होती. म्हणजेच न विचार करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का?

loading image